Ishan Kishan Saam TV
Sports

IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा इशान किशन होतोय ट्रोल; नेटकरी म्हणाले, ५० रुपयालाही मिळते 'ओपनर'

नरेश शेंडे

मुंबई : मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या १५ व्या मोसमात (IPL 2022) प्रतिस्पर्धी संघासोबत आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यात सलग आठवेळा पराभव झाला. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलमध्ये पाचवेळा विजेतेपद जिंकून क्रिकेटविश्वात आपल्या अप्रतिम कामगिरीचा ठसा उमटवला. मात्र, कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाची यंदाच्या आयपीएलच्या मोसमात पुरती वाताहत झाली आहे. आठ सामन्यांमध्ये एकही सामना न जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सवर आता नेटकऱ्यांनी ट्रोलींगची फटकेबाजी सुरु केलीय. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या लिलावात तब्बल १५ कोटींची बोली लावून इशान किशनचा (Ishan kishan) संघात समावेश केला. परंतु, सुरुवातीचे काही सामने वगळता इशानने फलंदाजीत फारशी चमकदार कामगिरी केली नाहीय. रविवारी लखनौ विरोधात झालेल्या सामन्यात इशानने ४० च्या स्ट्राईक रेटने २० चेंडूत अवघ्या आठच धावा केल्या. त्यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज इशान किशनला ट्रोल (user trolling) करण्यास सुरुवात केलीय. १५ कोटींऐवजी ५० रुपयाला ओपनर मिळते अशी खोचक टीका करता नेटकऱ्यांनी इशानची खिल्ली उडवली आहे.

रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सच्या लढतीत पुन्हा एकदा मुंबईचा पराभव झाला. लखनौचा कर्णधार के एल राहुलने ६२ चेंडूत नाबाद १०३ धावांची खेळी करत यंदाच्या आयपीएलमध्ये दुसरं शतक ठोकलं. त्यानंतर गोलंदाजांच्या भेदक कामगिरीमुळं लखनौने मुंबईला पराभूत केलं. लखनौने २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या होत्या. त्यानंतर १६९ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ ८ बाद १३२ धावांवर गारद झाला.

आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये सर्वात महागडा खेळाडू इशान किशन

आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शमध्ये २३ वर्षीय इशान किशन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सने त्याच्यावर सर्वाधीक १५.२५ कोटींची बोली लावली होती. त्यामुळे कोट्यावधी रुपयांनी खरेदी केलेल्या इशानकडून मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना चमकदार कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, मागील काही सामन्यांमध्ये इशान किशनच्या खराब कामगिरीमुळं मुंबईच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे. नेटकऱ्यांनीही त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केलीय. एका युजरने कमेंट करत म्हटलंय, १५ कोटींच्या बोलीऐवजी ५० रुपयांचा ओपनर विकत घेतला असता तर अधिक चांगलं झालं असतं. दरम्यान, इशान किशनने आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये २८.४३ च्या सरासरीनं इशानने १९९ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्थशतकांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT