Cricketer Rohit Sharma: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा १६ व्या हंगामात सध्या जोमात सुरू आहे. आतापर्यंत हंगामातील निम्मे सामने संपले आहेत. यंदाच्या हंगामात क्रिडाप्रेमींना डेथ ओव्हरचा थरार अनुभवायला मिळतोय. कारण, हंगामातील सर्वच सामने शेवटच्या षटकापर्यंत जात आहेत. मंगळवारी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्समध्ये रंगदार सामना झाला. (Latest sports updates)
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात (IPL 2023) हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा तब्बल ५४ धावांनी पराभव केला. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव असून यंदाच्या हंगामातील चौथा पराभव आहे.
दरम्यान, आयपीएल सुरू असताना भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) एक मोलाचा सल्ला दिला आहे. रोहित शर्माने आयपीएलमधून तातडीने माघार घ्यावी, असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे.
आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी हिटमॅन तंदुरूस्त असणे गरजेचे असून त्याने आता विश्रांती घ्यायला हवी, असे गावस्करांचे म्हणणे आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली असून यावेळी त्यांचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघासोबत होणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एल. राहुल, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.