mumbai indians twitter
Sports

W,W,W,W,W,W,W,W,W,W.. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने रणजी ट्रॉफीत राडा केला! Anshulने एकाच डावात घेतल्या 10 विकेट्स

Anshul Kamboj Record In Ranji Trophy: मुंबई इंडियन्सचा गोलंदाज अंशुल कंबोजने एकाच डावात १० गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.

Ankush Dhavre

Anshul Kamboj News In Marathi: रणजी ट्रॉफी स्पर्धेतील एलीट सी गटातील सामना हरियाणा आणि केरळ या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात हरियाणाकडून खेळताना अंशुल कंबोजने रेकॉर्डब्रेक गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी करताना त्याने एकापाठोपाठ १० फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एकाच डावात १० गडी बाद करणारा तो तिसराच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अनिल कुंबळे, सुभाष गुप्ते आणि देवाशीष मोहंती यांनी हा कारनामा करुन दाखवला आहे. (Anshul Kamboj News In Marathi)

अंशुल कंबोज या गोलंदाजाला मुंबई इंडियन्सने ओळख दिली. गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सने त्याला खेळण्याची संधी दिली होती. या संधीचा फायदा घेत त्याने शानदार गोलंदाजी केली होती. आता त्याने एकापेक्षा एक स्टार खेळाडूंना तंबूत धाडत १० गडी बाद केले आहेत.

केरळ संघाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर केरळकडून ३ फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली. तर अंशुल कंबोजच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने या डावात गोलंदाजी करताना ३०.१ षटकात अवघ्या ४९ धावा खर्च केल्या आणि १० गडी बाद केले. अंशुल कंबोज गोलंदाजीसह फलंदाजीतही योगदान देऊ शकतो.

मुंबई इंडियन्सने त्याला गेल्या हंगामात ३ सामने खेळण्याची संधी दिली होती. मात्र आगामी हंगामापूर्वी त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता त्याची ही कामगिरी पाहून नक्कीच लिलावात तो भाव खाणार. मुंबई इंडियन्सचा संघ त्याला पुन्हा संघात घेण्यासाठी मोठी किंमत मोजू शकतो.

यापूर्वी या दिग्गजांनी केलाय हा रेकॉर्ड

अंशुल कंबोज हा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एकाच डावात १० गडी बाद करणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अनिल कुंबळे यांनी १९९८-९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना हा कारनामा केला होता. यापूर्वी सुभाष गुप्ते यांनी १९५४-५५ आणि देवाशीष मोहंती यांनी २०००-०१ मध्ये हा कारनामा केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT