mumbai indians becomes first team to knock out of ipl 2024 after defeat of lucknow super giants amd2000 twitter
Sports

IPL 2024, Points Table: लखनऊच्या पराभवाचा मुंबई इंडियन्सला दणका! बनला स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिलाच संघ

IPL Points Table: आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पाच वेळेस जेतेपदावर नाव कोरणारा मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिलाच संघ ठरला आहे.

Ankush Dhavre

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पाच वेळेस जेतेपदावर नाव कोरणारा मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिलाच संघ ठरला आहे. हैदराबादच्या मैदानावर पराभव हा लखनऊचा झाला मात्र फटका हा मुंबई इंडियन्सला बसला आहे. सध्या कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचा संघ प्रत्येकी १६-१६ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या दुसऱ्या स्थानी आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा संघ १४ गुणांसह तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. मुंबईने पुढील दोन्ही सामने जिंकले तरी मुंबई या संघांना मागे सोडू शकणार नाही.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं,तर या संघाने १२ सामने खेळले आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्सला केवळ ४ सामने जिंकता आले आहेत. इथून पुढे मुंबईचे २ सामने शिल्लक आहेत. हे दोन्ही सामने जिंकले तरीदेखील मुंबईचा संघ केवळ १२ गुणांसह पोहचू शकतो. उर्वरीत संघांना १४ गुणांपर्यंत जाण्याची संधी आहे. त्यामुळे मुंबईचा प्रवास इथेच थांबला आहे.

गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं, तर लखनऊ सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ मागे पुढे आहेत. या दोन्ही संघांचे प्रत्येकी २-२ सामने शिल्लक आहेत. दोन्ही संघांचे १२-१२ गुण आहेत. त्यामुळे पुढील सामना जिंकून दोन्ही संघांना १४ गुणांपर्यंत जाण्याची संधी असणार आहे. लखनऊ आणि दिल्लीचा संघ सोडला, तर चेन्नई सुपर किंग्ज संघाला अजून ३ सामने खेळायचे आहेत. चेन्नईचे १२ गुण आहेत. त्यामुळे चेन्नईला १८ गुणांपर्यंत जाण्याची संधी असणार आहे.

मुंबईचा प्रवास संपला..

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला होता. गेल्या १० वर्षांपासून संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवण्यात आली. मात्र ही जबाबदारी त्यांना योग्यरित्या हाताळता आली नाही. कारण मुंबईला आतापर्यंत १२ सामन्यांपैकी ८ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर केवळ ४ सामने जिंकता आले आहेत. नेतृत्वासह हार्दिकला फलंदाजीत आणि गोलंदाजीतही हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Missing Link Project : मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार; 'मिसिंग लिंक' प्रकल्प गेम चेंजर ठरणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Maharashtra Live News Update : शासकीय अधिकारी आणि शिवप्रेमींनी किल्ले रायगडावर साजरा केला जल्लोष

Singrauli News: म्हैस चक्क घराच्या छतावर चढली|VIDEO

Beed Crime : बीडमध्ये भयंकर घडलं! उसने दिलेले पैसे मागितल्याने महिलेला बेदम मारहाण

Multibagger stock : देनेवाला जब भी देता...! वर्षभरात एका लाखाचे झाले 8,400,000 रुपये; १०० रुपयांच्या शेअरने केली कमाल

SCROLL FOR NEXT