MS Dhoni  Saam Tv
Sports

MS Dhoni 200th Match: चेपॉकवर उतरताच 'थाला' साजरे करणार नवे द्विशतक! विराट अन् रोहितलाही जमणं अशक्यच

MS Dhoni Record: या सामन्यात उतरताच एमएस धोनीच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे.

Ankush Dhavre

CSK VS RR IPL 2023: एमएस धोनी हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. एमएस धोनीने आपल्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला ४ वेळेस आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली आहे.

आज चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यात उतरताच एमएस धोनीच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे.

एमएस धोनी आज चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार म्हणून २०० वा सामना खेळण्यासाठी मेदानात उतरणार आहे. असा कारनामा करणारा तो पहिलाच कर्णधार ठरला आहे. या विक्रमाच्या बाबतीत इतर कर्णधार त्याच्या आस पास देखील नाहीये. या संघाचे नेतृत्व करताना त्याने २०१०,२०११,२०१८ आणि २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाला जेतेपद जिंकवून दिले आहे.

एमएस धोनी हा २१३ वेळेस कर्णधार म्हणून मैदानात उतरला आहे. यादरम्यान त्याला १२५ सामन्यांमध्ये विजय मिळवून देता आला आहे. तर ८७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान ५७.५६ ही त्याच्या विजयाची सरासरी राहिले आहे. हेच कारण आहे की,एमएस धोनी हा सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे.

तसेच २०१६-१७ मध्ये जेव्हा चेन्नई सुपर किंग्ज संघावर निर्बंध लावण्यात आले होते. त्यावेळी एमएस धोनीने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे नेतृत्व केले होते. या हंगामातील १४ सामन्यांपैकी केवळ ५ सामन्यांमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला विजय मिळवता आला होता.

तर चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधीत्व करताना १९९ सामन्यांपैकी १२० सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. तर ७८ सामन्यांमध्ये पराभव आणि एक सामना हा अरनिर्णित राहिला होता.

तसेच एमएस धोनीच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत ३९.०९ च्या सरासरीने ५००४ धावा केल्या आहेत. तसेच कर्णधार म्हणून २०० वा सामना खेळत असलेल्या सामन्यात धोनीकडून मोठया खेळीची अपेक्षा असणार आहे.

आज चेन्नईचा सामना हा राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने या स्पर्धेतील ३ सामन्यांपैकी २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Latest sports updates)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : पंक्चर कार बाजूला घेताना वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटना

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Ladki Bahin Yojana: लाडकीची e KYC करण्याचा निर्णय का घेतला? कारण आलं समोर

Sleep Routine: दररोज ८ तास झोपल्यानंतरही प्रकृती बिघडू शकते? Sleeping Time म्हणूनच महत्वाचा

Sambhajinagar: अतिवृष्टीनं पीक गेलं, मुलीच्या कॉलेजची फी कशी भरायची? हतबल झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

SCROLL FOR NEXT