ms dhoni, virat kohli and rohit sharma
ms dhoni, virat kohli and rohit sharma google
क्रीडा | IPL

धोनी, विराट आणि रोहित शर्माला एकाच दिवशी मिळालं मोठं गिफ्ट!

नरेश शेंडे

मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये (IPl 2022) विजेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सर्वच संघांतील खेळाडूंनी कंबर कसली आहे. यंदाच्या मोसमात विजयाची पताका फडकवण्यासाठी नवखे खेळाडूही प्रभावी कामगिरी करताना दिसत आहेत. परंतु, भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली (virat kohli) आणि कर्णधार रोहित शर्मानं (Rohit sharma) यावर्षीच्या आयपीएलमध्ये हवी तशी धमक दाखवली नाही. विराटसह रोहित धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. मात्र, खराब फॉर्ममधून जाणाऱ्या विराट आणि रोहितसाठी काल ३० एप्रिलला आशेचा किरण चमकला. गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली. गेल्या आठ सामन्यांत सूर न गवसलेल्या विराटच्या बॅटमधून धावांची फटकेबाजी झाल्याने त्याच्या चाहत्यांमध्येही उत्साह संचारला होता. तर दुसरीकडे सलग आठ सामन्यांमध्ये पराभव झालेल्या मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्सचावर मात करत सामना खिशात घातला. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माला त्याच्या वाढदिवशीच मोठं गिफ्ट मिळालं.

तर दुसरीकडे, महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई आयपीएलमध्ये आतापर्यंत चारवेळा अजिंक्यपद जिंकलं आहे. यंदाच्या हंगामात भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला चेन्नईच्या कर्णधार पदाची जबाबदारी दिली होती. मात्र, जडेजाला आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून चुणूक दाखवता आली नाही. त्यामुळं अनुभवी दिग्गज खेळाडू महेंद्र सिंग धोनीकडे पुन्हा एकदा चेन्नईचं नेतृत्व दिलं आहे. या तिनही सुखद घडामोडी काल एकाच दिवशी घडल्यानं भारताचे धुरंधर खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा आणि माजी कर्णधार धोनीला मोठं गिफ्टचं मिळालं आहे.

विराट कोहली फॉर्ममध्ये

गेल्या आठ सामन्यांमध्ये विराट कोहली धावांसाठी संघर्ष करत होता. त्या सामन्यांमध्ये विराटला एकही अर्धशतक ठोकता आलं नव्हतं. पण, काल शनिवारी गुजरात टायटन्सच्या विरोधात झालेल्या सामन्यात विराटने अर्धशतकी खेळी केल्याने तो पुन्हा एकदा आयपीएलमध्ये फॉर्ममध्ये आला आहे. विराट गेल्या काही सामन्यांमध्ये सलग दोनदा गोल्डन डकवर आऊट झाला होता. त्यानंतर काही दिग्गज खेळाडूंनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, विराटने गुजरात विरोधात ५३ चेंडूत ५८ धावा केल्याने तो पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आल्याचं संकेत दिले.

धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार

रोहित शर्माच्या वाढदिवशी मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिला सामना जिंकून विजयाचं खातं उघडलं. तसंच विराटनेही गुजरातच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत अर्धशतक ठोकलं. अशा दोन गोड बातम्या काल ३० एप्रिलला मिळाल्यानंतर सायंकाळीही चेन्नई सुपर किंग्जच्या रविंद्र जडेजाने कर्णधारपद सोडल्याचं जाहीर केलं आणि नव्या नेतृत्वाची जबाबदारी पुन्हा एकदा महेंद्र सिंग धोनीला दिली. त्यामुळे काल विराट, कोहली आणि धोनीला एकाच दिवशी मोठं गिफ्ट मिळालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT