Sports

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

MS Dhoni : एम.एस. धोनी आयपीएल २०२६ च्या पहिल्या दोन आठवड्यांसाठी संघाबाहेर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे.

Bharat Jadhav

इंडियन प्रीमियर लीगचा १९वा हंगाम २८ मार्च रोजी सुरू झाला आहे. या स्पर्धेत ५ वेळा ही ट्रॉफी जिंकलेला चेन्नई सुपर किंग्स संघ ३० मार्च रोजी गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर आपला पहिला सामना खेळणार आहे. या आधी चेन्नईच्या संघला मोठा धक्का बसला आहे. सीएसकेचा सर्वात मोठा खेळाडू आणि माजी कर्णधार एम.एस. धोनी या सामन्यात दिसणार नाहीये.

२०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ४४ वर्षीय धोनी आता केवळ आयपीएलमध्येच खेळतोय. वयामुळे त्याला आपली तंदुरुस्ती टिकवून ठेवणे थोडे कठीण झाले आहे. पोटरीच्या दुखापतीमुळे धोनी आयपीएल २०२६ च्या पहिल्या दोन आठवड्यांसाठी संघाबाहेर असणार आहे. यामुळे सर्वांचे लक्ष त्याच्या पुनरागमनाकडे लागले आहे.

चेन्नई सुपर किंग्सने एम.एस. धोनीच्या दुखापतीबाबत एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. धोनी दोन आठवड्यांसाठी संघाबाहेर राहील असे सांगण्यात आले आहे. दरम्यान टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार सीएसके संघातील सूत्रांनी सांगितले आहे की, धोनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापूर्वी मैदानावर परतेल अशी शक्यता कमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT