ms dhoni six twitter
Sports

MS Dhoni's Six Video: 'थाला ’ जुन्या रंगात परतलाय! वुडच्या भेदक माऱ्यासमोर खेचले २ लागोपाठ षटकार- VIDEO

MS Dhoni Six Video: ३ चेंडूंचा सामना करत त्याने सलग २ चेंडूंवर २ षटकार मारले

Ankush Dhavre

CSK Vs LSG Highlights: चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही इनिंगमध्ये २०० पेक्षा अधिक धावा झाल्याचे पाहायला मिळाले.

शेवटी चेन्नई सुपर किंग्ज संघाने या सामन्यात बाजी मारत १२ धावांनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात २ षटकार मारणाऱ्या एमएस धोनीच्या नावे मोठ्या विक्रमांची नोंद झाली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनीने आयपीएल कारकीर्दीत ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. एमएस धोनीला या डावात जास्त चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. तो शेवटी फलंदाजीला आला होता. ३ चेंडूंचा सामना करत त्याने सलग २ चेंडूंवर २ षटकार मारले. या षटकारांसह त्याने आपल्या ५००० धावा पूर्ण केल्या आहेत.

यासह आयपीएल स्पर्धेत ५००० धावा करणारा तो सातवा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि एबी डिव्हिलियर्स आणि शिखर धवन या फलंदाजांनी हा विक्रम केला आहे. (Ms Dhoni Completed 5000 Runs In IPL)

एमएस धोनीचे क्लासिक षटकार...

चेन्नई सुपर किंग्ज हा संघ तब्बल ४ वर्षांनंतर आपल्या घरच्या मैदानावर खेळत होता. त्यामुळे क्रिकेट चाहते धोनीला फलंदाजी करताना पाहण्याची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र त्याला केवळ ३ चेंडू खेळण्याची संधी मिळाली.

या ३ चेंडूंमध्ये त्याने २ षटकार मारले. पहिला षटकार त्याने वाईड थर्ड मॅनच्या दिशेने मारला. तर दुसरा षटकार त्याने मिड विकेटच्या दिशेने मारला. (MS Dhoni Sixes)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, लखनऊ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली.

तर डेव्होन कॉनवेने ४७ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटक अखेर ७ गडी बाद २१७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना काईल मेयर्सने ५३ धावांची तुफानी खेळी केली.

तर निकोलस पुरनने ३२ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. मात्र शेवटी चेन्नई सुपर किंग्ज संघाने बाजी मारत ३ गडी राखून या सामन्यात विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धक्कादायक, अमरावतीच्या मेळघाटात अजूनही 2206 बालके कुपोषित

Ahemdabad Air India Plane Crash : इंधनपुरवठा केवळ 3 सेकंदात ठप्प; एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर| VIDEO

Shravani Somvar 2025: जर तुम्ही पहिल्यांदाच श्रावनी सोमवारचा उपवास करणार असाल तर या गोष्टी ठेवा लक्षात

Jayant Patil: मोठी बातमी! जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद सोडलं, शशिकांत शिंदेंच्या हाती धुरा

Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला! १० तोळाच्या दरात ७१०० रुपयांची वाढ, २२-२४ कॅरेटचे आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT