MS Dhoni Retirement x
Sports

MS Dhoni : अखेर फैसला झालाच! एमएस धोनी निवृत्ती कधी घेणार? थालाने 'तो' क्षणच सांगितला

MS Dhoni Retirement : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यादरम्यान महेंद्रसिंह धोनी आता रिटायरमेंट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता खुद्द धोनीनेच निवृत्तीच्या चर्चांवर भाष्य केले आहे.

Yash Shirke

Mahendra Singh Dhoni : महेंद्रसिंह धोनीचे आई-वडील, त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा कालचा चेन्नई विरुद्ध दिल्ली हा सामना पाहण्यासाठी आले होते. त्यामुळे काल धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या होत्या. एमएस धोनीने काल निवृत्तीची घोषणा केली नाही. पण त्याने निवृत्ती कधी घेणार यावर भाष्य केले. एका पॉडकास्टमध्ये धोनीने रिटायरमेंटच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना काल चेपॉकच्या स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने २५ धावांनी चेन्नईचा पराभव केला. या सामन्यात आक्रमक पद्धतीने न खेळल्याने महेंद्रसिंह धोनीवर टीका करण्यात आली होती. कालच्या सामन्यामध्ये एमएस धोनीने २६ बॉल्सवर ३० धावा केल्या होत्या. आक्रमक खेळायची गरज असताना धोनी संथगतीने खेळला, त्यामुळे चेन्नईचा पराजय झाला असे लोक म्हणत होते.

राज शमानीच्या पॉडकास्ट चॅनलवर महेंद्रसिंह धोनीने भेट दिली. तेव्हा पॉडकास्टमध्ये एमएस धोनी म्हणाला, 'मी अजूनही आयपीएल खेळत आहे आणि मी एका वेळेस एका वर्षाचा विचार करतोय. मी आता ४३ वर्षांचा आहे, या जुलैमध्ये मी ४४ वर्षांचा होईन. त्यामुळे आणखी एक वर्ष खेळायचे की नाही हे ठरवण्यासाठी माझ्याकडे १० महिने आहेत. पण हा निर्णय मी घेणार नाही, मी खेळेन की नाही हे माझे शरीर ठरवेल.'

आयपीएल २०२५ मध्ये धोनीने ४ सामन्यांमध्ये मिळून ७६ धावा केल्या आहेत. चेन्नई विरुद्ध बंगळुरू या सामन्यांमध्ये वरच्या क्रमावर फलंदाजीसाठी न आल्याने काही दिवसापूर्वी धोनीवर टिका झाली होती. त्यावर सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी प्रतिक्रिया दिली होती. गुडघ्यांच्या दुखण्यामुळे धोनीला १० ओव्हर्स फलंदाजी करणे शक्य नसल्याचे फ्लेमिंग यांनी स्पष्ट केले होते. तेव्हापासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत FDAची धडक कारवाई; सांगलीहून आणलेले ५०० लिटर भेसळयुक्त सुटे दूध जप्त

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT