IPL 2026 experienced players list saam tv
Sports

IPL 2026: धोनी, रोहित, कोहली...IPL 2026 मधील सर्वात वयस्कर 10 खेळाडूंची यादी पाहिली का?

IPL 2026 experienced players list: आयपीएल 2026 सुरू होण्याआधी सर्वात वयस्कर खेळाडूंची यादी समोर आली आहे. एमएस धोनी या यादीत पहिल्या क्रमांकावर असून रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुनील नरीन यांसारखे अनुभवी खेळाडूही टॉप-10 मध्ये आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल 2026 सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. 28 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर बंगळूरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना सामना रंगणार आहे. दरम्यान आयपीएल सुरु होण्यापूर्वी यंदाच्या सिझनमधील वयस्कर खेळाडूंची यादी समोर आली आहे.

या यादीत पहिल्या क्रमांकावर महेंद्रसिंग धोनी आहे. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार धोनी यंदा 44 वर्षांचा असून 7 जुलैला तो 45 वर्षांचा होणार आहे. गेल्या काही सिझनप्रमाणे यंदाही हा त्याचा शेवटचा सिझन असू शकतो, अशी चर्चा रंगलीये. जाणून घेऊया धोनीसोबत अजून कोणत्या खेळाडूंची यामध्ये नावं आहेत.

कोहली-रोहितही टॉप-10 मध्ये

या यादीत टीम इंडियाचे दोन मोठे स्टार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचाही समावेश आहे. रोहित शर्मा 38 वर्षांचा असून कोहली 37 वर्षांचा आहे आणि दोघंही यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. हिटमॅन रोहित या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. कोहलीसोबत सुनील नरीन, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा हे देखील 37 वर्षांचे आहेत. त्यामुळे त्यांचाही यामध्ये समावेश आहे.

स्टार्क-शमी-भुवनेश्वरही यादीत

धोनी, रोहित आणि कोहलीसोबत या यादीत रविंद्र जडेजाचं नाव येतं. जडेजा सध्या 36 वर्षांचा असून यंदाच्या सिझनमध्ये तो नव्या टीमकडून खेळताना दिसणार आहे. यावेळी तो पिवळ्या जर्सीत नाही, तर गुलाबी जर्सीत मैदानात उतरणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने संजू सॅमसनसोबतच्या ट्रेडमध्ये त्याला राजस्थान रॉयल्सकडे पाठवलं आहे. याशिवाय मिचेल स्टार्क आणि भुवनेश्वर कुमार हे अनुभवी गोलंदाजही 35 वर्षांच्या वयात आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत.

IPL 2026 मधील टॉप-10 वयस्कर खेळाडू

  • एमएस धोनी 44 - चेन्नई सुपर किंग्स

  • रोहित शर्मा 38- मुंबई इंडियन्स

  • विराट कोहली 37- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

  • इशांत शर्मा 37- गुजरात जायंट्स

  • अजिंक्य रहाणे 37- कोलकाता नाईट रायडर्स

  • सुनील नरीन 37 - कोलकाता नाईट रायडर्स

  • रवींद्र जडेजा 36 - राजस्थान रॉयल्स 36

  • मिचेल स्टार्क 35 - दिल्ली कॅपिटल्स

  • मोहम्मद शमी 35 - लखनऊ सुपर जायंट्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या मोर्चावेळी का संतापल्या टीना चौधरी? गिरीश महाजनांबाबत काय म्हणाल्या?

Fake Ghee Racket: गावरान तूप नाही तर चक्क जनावरांची चरबी, किळसवाण्या कारखान्याचा पर्दाफाश

स्वस्त गॅससाठी व्यावसायिकांचा जीवाशी खेळ; गॅस रिफिलचा व्यावसायिकांकडून गैरवापर?

BJP- Shivsena Alliance: भाजप- शिंदेसेना युती तुटणार? शिंदेंच्या शिलेदारानेच उघडले पत्ते

Shocking News: पोलिस महानिरीक्षकांवरच गंभीर गुन्हा दाखल; बलात्कार केल्याचा महिलेचा आरोप

SCROLL FOR NEXT