ms dhoni
ms dhoni  twitter
क्रीडा | IPL

WATCH- चेपॉकच्या मैदानावर रंगला धोनीचा फेअरवेल सामना? लवकरच IPL स्पर्धेला करणार राम राम - VIDEO

Ankush Dhavre

CSK VS KKR IPL 2023: आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीपासून एमएस धोनी चेन्नईचे नेतृत्व करतोय. सध्या तो आयपीएल कारकिर्दीतील शेवटच्या टप्प्यात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केल्यानंतर आता आयपीएल स्पर्धेतून देखील तो लवकरच माघार घेऊ शकतो.

आयपीएल २०२३ स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच अशा चर्चा सुरू आहेत की, हे धोनीचं शेवटचं हंगाम असणार आहे. दरम्यान रविवारी झालेल्या सामन्यात त्याने निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.

धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ यावेळी प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. प्लेऑफपूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाचे घरचे सामने संपले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेला सामना हा चेपॉकच्या मैदानावरील या हंगामातील शेवटचा सामना ठरला. त्यामुळे धोनीसह संघातील खेळाडू चाहत्यांना अभिवादन करताना दिसून आले.

या दरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडूंनी चाहत्यांना गिफ्ट देखील दिले. गिफ्ट देण्यात एमएस धोनी सर्वात पुढे होता. त्याने हातात एक टेनिस रॅकेट घेतला आणि त्या रॅकेटने बॉल प्रेक्षकांपर्यंत पोहचवत होता. त्याने न थकता कितीतरी चेंडू प्रेक्षकांपर्यंत पोहचवले.

इतकेच नव्हे तर त्यांनी चाहत्यांना टी - शर्ट देखील दिले. जे खेळाडू धोनी सोबत चालत होते, त्यांच्या हातात बोर्ड होते. ज्यावर धन्यवाद असे लिहिले होते. या सामन्यात काही भाग्यवान चाहत्यांना धोनीला भेटण्याची संधी मिळाली. या भेटीचं वैशिष्ठ्य म्हणजे पूर्णवेळ धोनीच्या चेहऱ्यावर हास्य होतं.

हे हास्य सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कायम होतं. त्याने अनेकांसोबत फोटो क्लिक केले. ज्यात पोलीस, कर्मचारी आणि चाहत्यांचा समावेश होता.

साखळी फेरीतील शेवटचा सामना असला तरीदेखील चेन्नईचा संघ पुन्हा एकदा चेपॉकच्या मैदानावर खेळताना दिसून येऊ शकतो. कारण चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या वाटेवर आहे. प्लेऑफचे सामने चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोलकाता नाईट रायडर्स संघातील गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांना गुंतवून ठेवलं.

चेन्नई सुपर किंग्ज संघाला २० षटक अखेर १४४ धावा करता आल्या. चेन्नई कडून शिवम दुबेने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली.

कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून गोलंदाजी करताना सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. कोलकाताच्या गोलंदाजांनी नियंत्रणात गोलंदाजी केली. ही कामगिरी चेन्नईच्या गोलंदाजांना करता आली नाही.

कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून रिंकू सिंग आणि नीतीश राणाने अर्धशतकी खेळी करत कोलकाताला हा सामना जिंकून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024: शिवम दुबेची अफलातून फलंदाजी; या बाबतीत दिग्गजांनाही सोडलं मागे

Hot Water Benefits: जेवण केल्यानंतर गरम पाणी पिण्याचे फायदे काय?

Mumbai Crime: कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार; पत्नीने बनवला व्हिडिओ अन्.. मुंबईतील संतापजनक घटना

IPL 2024 Playoffs: CSK चं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी करावं लागेल हे काम

Anuj Thapar News : "अनुज थापरची आत्महत्या नाही तर हत्या...", कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

SCROLL FOR NEXT