MS Dhoni Insta
Sports

MS Dhoni : महेंद्रसिंह धोनीच्या गुडघ्याला दुखापत? RCB Vs CSK सामन्याआधी फोटो आला समोर; खेळण्यावर प्रश्नचिन्ह

Mahendra Singh Dhoni : चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

RCB VS CSK IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना आज चिन्नास्वामी स्टेडियवर खेळला जाणार आहे. या सामन्यामध्ये विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी शेवटचे आमनेसामने येऊ शकतात असे म्हटले जात आहे. सामना सुरु होण्यापूर्वी एमएस धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये धोनीच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला पट्टी बांधल्याचे पाहायला मिळते. या पट्टीमुळे चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

पंजाब किंग्सचा स्टार फलंदाज शशांक सिंगने एमएस धोनीसोबतचा फोटो पोस्ट केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये शिक्षण कधीही थांबत नाही असे शशांकने लिहिले. या फोटोमध्ये शशांक धोनीच्या पायाजवळ बसल्याचे पाहायला मिळते. त्याशिवाय धोनीच्या पायाला बॅन्डेज देखील असल्याचे दिसते. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

४३ वर्षीय एमएस धोनीला मागील काही वर्षांपासून गुडघ्याचा सतत त्रास होत आहे. २०२३ मध्ये धोनीच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते. आयपीएल २०२५ च्या सुरुवातीलाच ३० मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यानंतर सीएसकेचा मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी गुडघ्यांच्या त्रासामुळे धोनीला फलंदाजी करताना अडचणी येत असल्याचे सांगितले होते.

एमएस धोनीने यंदाच्या सीझनमध्ये १० इनिंग्समध्ये २५.१६ च्या सरासरीने आणि १४८.०३ च्या स्ट्राईक रेटने फक्त १५१ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२५ हा सीझन फक्त महेंद्र सिंह धोनीच नाहीतर चेन्नई सुपर किंग्ससाठीही वाईट ठरला. चेन्नईने संपूर्ण सीझनमध्ये खराब कामगिरी केली. चेन्नईचा संघ हा आयपीएल २०२५ मधून बाहेर पडलेला पहिला संघ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर सातपुड्यात पावसाला सुरुवात,येलो अलर्ट जारी

Self Help Allowance : बेरोजगारांना महिन्याला मिळणार १००० रुपये; निवडणुकीच्या तोंडावर नितीश सरकारची मोठी घोषणा

OBC Reservation: ''आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळ यांचा शरद पवारांना सवाल

Dudhi Halwa Recipe : नवरात्रीचा प्रसाद होईल स्पेशल, झटपट बनवा दुधीचा चविष्ट हलवा

Pune Rain: पुण्यात धडकी भरवणारा पाऊस, एका तासात रस्त्यांची झाली नदी; पुणेकरांचे प्रचंड हाल, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT