ms dhoni twitter
Sports

MS Dhoni Injury Update: एमएस धोनीच्या दुखापतीबाबत समोर आली मोठी अपडेट! येणारे काही सामने राहणार संघाबाहेर ?

MS Dhoni Injury News: चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी त्याच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट दिली आहे.

Ankush Dhavre

IPL 2023 GT VS CSK MS Dhoni Injury update: शुक्रवारी आयपीएल २०२३ स्पर्धेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला ५ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता.

हा सामना सुरु होण्यापूर्वी एमएस धोनीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. कारण सराव करताना तो दुखापतग्रस्त असल्याचे दिसून आले होते. तर सामना सुरु असताना देखील तो वेदनेने त्रस्त असल्याचे दिसून आले आहे.

दिपक चाहरच्या गोलंदाजीवर चेंडू अडवण्यासाठी दीपक चाहर डाइव्ह मारताना दिसून आला होता. जेव्हा तो गुडघ्यावर पडला त्यावेळी त्याला दुखापत झाल्याचे दिसून आले होते.

खाली पडताच तो वेदनेने विवळताना दिसून आला होता. आता चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी त्याच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट दिली आहे.

दुखापतग्रस्त होऊनही त्याने खेळणं सुरूच ठेवलं होतं. स्टीफन फ्लेमिंगने त्याच्या दुखापतीबाबत ट्विट करत मोठी अपडेट दिली आहे. ही दुखापत गंभीर नसून केवळ क्रॅंप असल्याचे स्टीफन फ्लेमिंग यांनी म्हटले आहे. मात्र अशा देखील बातम्या समोर येत आहे की, आगामी सामन्यातून तो बाहेर होऊ शकतो.

पहिल्या सामन्यात पराभूत झालेला चेन्नई सुपर किंग्ज संघ दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. चेन्नईचा पुढील सामना ३ एप्रिल रोजी लखनऊ संघाविरुद्ध रंगणार आहे. त्यामुळे या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघ केलेल्या चुका विसरून विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. (Lateat sports updates)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : ST प्रवाशांचा जीव धोक्यात; महामंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडूनच विभागाचा कारभार उघड

Vice President Election: इंडिया आघाडीची मतं फुटली; कोणी केली क्रॉस व्होटींग, कुठे गेम फिरला?

Wednesday Horoscope : संकष्टी चतुर्थीला बाप्पा ५ राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण करणार; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Nepal Crisis : माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवलं होतं घर

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT