MS DHONI SAAM TV
क्रीडा

MS Dhoni On Retirement: MS Dhoni लवकरच IPL ला करणार गुड बाय! थरारक विजयानंतर दिले निवृत्तीचे संकेत

Ankush Dhavre

CSK VS SRH IPL 2023: चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी हा कॅप्टन कुल म्हणून ओळखला जातो. सध्या तो सामन्यातील कामगिरीपेक्षा सामान्यानंतर झालेल्या प्रेजेंटेशन सेरेमनीमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे अधिक चर्चेत असतो.

गोलंदाज अतिरिक्त धावा देत असताना धोनीने थेट आपल्या गोलंदाजांना नव्या कर्णधाराच्यास नेतृत्वाखाली खेळण्यासाठी तयार राहण्याची वॉर्निंग दिली होती. आता हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर देखील त्याने मोठे वक्तव्य करत थेट निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने जोरदार कामगिरी करत हैदराबाद संघावर ७ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यानंतर झालेल्या प्रेजेंटेशन सेरेमनीमध्ये एमएस धोनीने म्हटले की, 'आणखी काय म्हणू, मी तर सर्व काही सांगितलं आहे. हा माझ्या कारकीर्दीतील शेवटचा टप्पा आहे. मला इथे खेळायला आवडतं. चाहत्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आहे.' एमएस धोनीच्या या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा एमएस धोनी लवकरच निवृत्तीची घोषणा करू शकतो, अशा चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. (Latest sports updates)

मथीसा पथिराना बद्दल बोलताना धोनी काय म्हणाला?

संघातील गोलंदाजांचे कौतुक करताना एमएस धोनी म्हणाला की, 'फलंदाजी करण्याची संधी मिळत नाहीये, मात्र याबाबत कुठलीच तक्रार नाहीये. आमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. फिरकी गोलंदाज आणि वेगवान गोलंदाज मुख्यता मथीसा पथिरानाने चांगल्या लाइन आणि लेंथवर गोलंदाजी केली. त्याच्याकडे वेरीएशन आहे आणि गती देखील आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध खेळताना धावा करणं कठीण जातं.' (MS Dhoni On Retirement)

चेन्नईचा जोरदार विजय..

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हैदराबाद संघाकडून प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्माने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली. तर राहुल त्रिपाठीने २१ धावांचे योगदान दिले.

या खेळीच्या जोरावर हैदराबाद संघाने २० षटक अखेर ७ गडी बाद १३४ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना डेवॉन कॉनव्हेने नाबाद ७७ धावांची खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने ३५ धावांचे योगदान दिले. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने ७ गडी राखून विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

Pune Truck Collapsed : २५ फूट खड्ड्यात कोसळला PMC चा ट्रक; मैलापाणी वाहिन्यांच्या दुरुस्तीकरताना दुर्घटना

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

IND vs BAN, 1st Test: रोहित- विराट पुन्हा एकदा फ्लॉप! गिलने मोर्चा सांभाळला; टीम इंडिया आघाडीवर,पाहा Scorecard

Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

SCROLL FOR NEXT