IPL 2023
IPL 2023 Saam TV
क्रीडा | IPL

CSK Playing 11 : येल्लोव अँड व्हिसल पोडू; धोनीची चेन्नई सुपरकिंग्स नव्या हंगामासाठी सज्ज, पाहा सर्वात मजबूत प्लेईंग 11

साम टिव्ही ब्युरो

IPL 2023 News:  आयपीएलच्या १६व्या सीजनला येत्या शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना मागील सीजनचे विजेते गुजरात टायटन्स आणि उपविजेते चेन्नई सुपरकिंग्समध्ये होणार आहे. दोन्ही संघ मोठ्या विजयाने सीजनची सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील.

चेन्नई सुपरकिंग्स आयपीएलमधील यशस्वी टीम आहे. मात्र मागील सीजन टीमसाठी निराशाजनक होता. कारण सीएसकेला प्लेऑफमध्येही जागा मिळवता आली नाही. यंदाच्या सीजनसाठी संघात नवीन सात खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. बेन स्टोक्स आणि अजिंक्य रहाणेदेखील सीएसकेच्या जर्सीमध्ये यंदाच्या सीजनमध्ये मैदानात दिसतील.

CSK कडून न्यूझीलंडचा ओपनर डेवोन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड ओपनिंगला येऊ शकतात. यानंतर अंबाती रायुडू, मोईन अली, शिवम दुबे यांच्यासह एमएस धोनी अशी बॅटिंग ऑर्डर असू शकते. संघात मोईन अली आणि दुबे यांच्यासह बेन स्टोक्स आणि रवींद्र जडेजा हे अष्टपैलू खेळाडू आहेत जे कधीही सामना बदलण्याची ताकद ठेवतात.

चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेईंग 11

डेवोन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोईन अली, बेन स्टोक्स, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थिकशन / मिचेल सँटनर.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT