mohammed siraj twitter
Sports

Mohammed Siraj: सिराजने टाकला आतापर्यंतचा सर्वात वेगवान बॉल? स्पीड पाहून विश्वासच बसणार नाही

Mohammed Siraj Bowling Speed: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजने सर्वात वेगवान चेंडू टाकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

IND vs AUS 2nd Test, Mohammed Siraj: भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. सामन्यातील पहिल्या दिवशी दोन्ही संघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली.

पहिल्या दिवशी भारतीय संघाचा डाव १८० धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला पहिल्या दिवसाखेर १ गडी बाद ८६ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ अजूनही ९४ धावांनी पिछाडीवर आहे.

दरम्यान पहिल्याच दिवशी मोहम्मद सिराजने असं काही केलं, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर, सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होतोय. ज्यात असं दिसतंय की, मोहम्मद सिराजने १८१.६ किमी गतीने चेंडू टाकल्याचा दावा केला जातोय. मात्र हे स्पीडगनमध्ये झालेल्या टेक्निकल एररमुळे झालं असल्याचं स्पष्ट झालं आहे.

केव्हा घडलं?

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना, २४ वे षटक टाकण्यासाठी सिराज गोलंदाजीला आला. या षटकात त्याने आतापर्यंतचे सारे रेकॉर्ड मोडणारे चेंडू टाकला. स्क्रिनवर चेंडूचा स्पीड ताशी १८१.६ किमीच्या गतीने आल्याचं दिसून आलं.

आतापर्यंत कुठल्याही गोलंदाजाने इतका वेगवान चेंडू टाकलेला नाही आणि टाकणं शक्यही नाही. स्पिडगनमध्ये झालेल्या एररमुळे ही चूक झाली. मात्र याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारताचा डाव १८० वर आटोपला

या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना, डावाच्या सुरुवातीलाच भारताला मोठा धक्का बसला. यशस्वी जयस्वाल पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला.

भारताकडून फलंदाजी करताना नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ३७, शुभमन गिलने ३१, आर अश्विनने २२ आणि रिषभ पंतने २१ धावांची खेळी केली. भारतीय संघाचा डाव १८० धावांवर आटोपला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT