Mohammed siraj becomes number 1 in latest icc odi bowling ranking Twitter
Sports

ICC ODI Ranking: मान गये मियाँ! ODI रँकिंगमध्ये सिराजची गरूडझेप; नवव्या स्थानावरून थेट अव्वल स्थानी

Latest ODI Ranking: नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेल्या रँकिंगमध्ये मोहम्मद सिराज अव्वल स्थानी पोहोचला आहे.

Ankush Dhavre

Mohammed Siraj Latest ODI Ranking:

आशिया चषकाचा अंतिम सामना कुठलाही क्रिकेट चाहता विसरू शकणार नाही. श्रीलंकेविरूद्ध झालेल्या या सामन्यात भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली होती.

या सामन्यात गोलंदाजी करताना सिराजने ६ गडी बाद केले होते. या कामगिरीचा फायदा त्याला आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये झाला आहे. नुकताच जाहीर करण्यात आलेल्या यादीत मोहम्मद सिराजने अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

आशिया चषक सुरू होण्यापूर्वी मोहम्मद सिराज ६४३ गुणांसह नवव्या स्थानी होता. मात्र आशिया चषकात केलेल्या दमदार कामगिरीच्या बळावर त्याने ८ स्थानांची झेप घेत अव्वल स्थान गाठलं आहे.

आता त्याचे रेटिंग पाँइंट्स ६९४ इतके आहेत. आशिया चषकात गोलंदाजी करताना त्याने १० गडी बाद केले आहेत. यापूर्वी मार्च २०२३ मध्ये तो गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी विराजमान झाला होता.

येत्या ५ ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेपूर्वी मोहम्मद सिराच पहिल्या स्थानी येणं ही भारतीय संघासाठी सकारात्मक बाब आहे. सध्या तो तुफान फॉर्ममध्ये आहे.

वर्ल्डकपमध्ये मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहच्या जोडीचा सामना करणं कुठल्याही संघासाठी मुळीच सोपं नसणार आहे. श्रीलंकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात ६ गडी बाद करताच त्याने वनडे कारकिर्दीत ५० गडी बाद केले आहेत. (Latest sports updates)

शुबमन गिल नंबर १ बनण्याच्या वाटेवर..

आयसीसीने जाहीर केलेल्या फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानी आहे. तर भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल या यादीत दुसऱ्या स्थानी कायम आहे.

मात्र रेटिंगच्या बाबतीत तो बाबर आझमच्या जवळ पोहोचला आहे. बाबर आझमचे रेटिंग पाँइंट्स ८५७ तर शुबमन गिलचे रेटिंग पाँइंट्स ८१४ इतके आहे. दोघांमध्ये केवळ ४३ रेटिंग पाँइंट्सचा फरक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT