Mohmmed Shami Saamtv
Sports

Mohmmed Shami Video: मोहम्मद शमीने हृदय जिंकलंं! अपघातग्रस्त तरुणासाठी ठरला देवदूत; VIDEO व्हायरल

Mohmmed Shami: सध्या नैनितालमध्ये सुट्टीची मजा घेत असतानाच शमीने दाखवलेल्या संवेदनशीलतेचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Gangappa Pujari

Mohmmed Shami Video:

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा थरार नुकताच संपला. या संपुर्ण विश्वचषक स्पर्धेतील आपल्या जबरदस्त कामगिरीने मोहम्मद शमीने भारतीयांची मने जिंकली. या स्पर्धेतील शमीच्या कामगिरीचे जगभरात कौतुक झाले. मैदानावरील आपल्या जबरदस्त कामगिरीसोबतच मोहम्मद शमी त्याच्या दिलदारपणासाठीही ओळखला जातो. सध्या नैनितालमध्ये सुट्टीची मजा घेत असतानाच शमीने दाखवलेल्या संवेदनशीलतेचं सर्वत्र कौतुक होत आहे.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या सहृदयी व्यक्तिमत्वाचा पुन्हा एकदा सर्वांना प्रत्यय आला. नैनितालमध्ये एका अपघातग्रस्त कारमधील लोकांना मदत करुन सर्वांचीच मने जिंकली आहेत. शमीने कार अपघातात जखमी झालेल्या लोकांना तर वाचवलेच पण त्यांना मदतही करताना दिसत आहे. शमीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

'हे खूप भाग्यवान आहेत. परमेश्वराने यांना दुसरं आयुष्य दिलंय. नैनीतालमध्ये एका खोल दरीत कार पडली होती. विशेष म्हणजे ही कार माझ्या गाडीच्या पुढेच धावत होती. त्यामुळे, त्या गाडीला अपघात होताच, आम्ही तात्काळ त्यांच्या मदतीसाठी धावलो आणि त्यांना सुरक्षितपणे गाडीतून बाहेर काढले,'' अशी माहिती शमीने दिली आहे. या व्हिडिओत शमी आणि त्याचे मित्र अपघातग्रस्तांना मदत करत असल्याचे दिसत आहे.

त्याच्या या कृतीचे चाहत्यांनी कौतुक केले आहे. शमीने शेअर केलेल्या व्हिडिओंना आतापर्यंत 5 लाख 80 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर चाहत्यांच्याही प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, मोहम्मद शामीने यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात दमदार गोलंदाजी केली. मोहम्मद शामीने अवघ्या ७ सामन्यात २४ विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनीही त्याची भेट घेत कौतुक केले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

SCROLL FOR NEXT