Prakash Ambedkar: आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला; जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत आहे तोपर्यंत...

Prakash Ambedkar: मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या संविधान सन्मान सभेत प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि आरएसएसवर सडकून टीका केली. या सभेत त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोलाचा सल्ला दिलाय.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSaam Tv
Published On

Samvidhan Sanman Sabha Prakash Ambedkar:

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या बराच चर्चेत असून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. आरक्षणासाठी आग्रही असलेल्या जरांगे पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचा सल्ला दिलाय. जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत आहे, तोपर्यंत रयतच्या मराठा समाजाला न्याय मिळणार नाही. प्रकाश आंबेडकर संविधानदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या संविधान सन्मान सभेत बोलत होते. (Latest News)

या सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि आरएसएसवर सडकून टीका केली. मंडल आयोगानं दिलेल्या आरक्षणासाठी आम्ही लढा लढत होतो, त्यावेळी काही ओबीसी मंडळी सोबत होती पण त्याला आरएसएसनं विरोध केला होता. आरएसएस कधीच ओबीसींचं भलं करणार नाही. तसेच जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत आहे तोपर्यंत रयतच्या मराठा समाजाला न्याय मिळणार नाही, एवढंच मी जरांगे पाटील यांना सांगतो. गुजरातमध्ये सोनिया गांधी यांच्या सल्लागारांनी मोदींना मौत का सौदागार म्हटले. तिथेच त्यांची सत्ता गेली, जरांगे कोणाचा सल्ला ऐकू नका, तुमचे असेच होईल असेही आंबेडकर म्हणालेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

देशाला स्वतंत्र होऊन ७० वर्ष झाली. आगामी लोकसभेत संविधान बदलण्याची चर्चा होईल. तो कळीचा मुद्दा असेल, असे म्हणत लोकसभा निवडणुका कधी असतील याचंही भाकीत प्रकाश आंबेडकर यांनी केले. देशातील लोकसभा फेब्रुवारी आणि मार्च होईल, अशी शक्यता वर्तवलीय. आरक्षणाच्या नावाने समजात समजात भिडवले जात आहे. २००२ मध्ये गोध्रा झाले , २०२३ मध्ये मणिपूर झाले, आता 3 डिसेंबरला आणखीन काही तरी घडवतील. लोकांनी सावध राहावं. तीन डिसेंबरनंतर राजकारणाचे उग्र स्वरूप बघायला मिळेल, असंही ते म्हणाले.

Prakash Ambedkar
Who is Rushikesh Bedre : अंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेकीतील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेदरे नेमका आहे तरी कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com