Indian Cricket Team saam tv
Sports

T20 World Cup 2022 : जसप्रीत बुमराहच्या जागेवर कोण खेळणार? बीसीसीआयने दिली मोठी माहिती

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागेवर रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्डकपची रणधुमाळी सुरू होणार आहे. वर्ल्डकपसाठी टीम इंडिया (Team India) सज्ज झाली असून स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागेवर रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) बुमराहच्या जागेवर 15 सदस्यांच्या भारतीय संघामध्ये सामील केलं आहे. पाठीच्या दुखापतीमुळं बुमराह टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळणार नाहीय. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली आहे. (Indian cricket team latest news update)

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने मोहम्मद शमीला आयसीसी पुरूष टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात जसप्रीत बुमराहच्या जागेवर खेळवण्याची घोषणा केलीय. शमी ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरला राखीव खेळाडू म्हणून घोषीत केला आहे.

टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा स्क्वॉड : रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल (उप कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव,दीपक हुड्डा, रिषभ पंत (विकेट किपर), दिनेश कार्तिक (विकेट किपर), हार्दिक पंड्या, आर आश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Rain : कृष्णा आणि वारणा नदीवरील १६ बंधारे पाण्याखाली; शेतांमध्ये साचले पाणी

Realme 15 आणि 15 pro सिरीजची एंट्री! जाणून घ्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये काय आहे खास

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Baramati Accident: सोन्यासारखा मुलगा आणि २ नातींचा अपघाती मृत्यू, धक्का सहन न झाल्याने आजोबांनीही सोडलं प्राण

'अल्लाहू अकबर...विमानात बॉम्ब आहे' प्रवाशानं घातला गोंधळ, VIDEO समोर; विमानात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT