gt vs mi
gt vs mi saam tv
क्रीडा | IPL

GT vs MI, Eliminator: मुंबई समोर मोठं संकट! गुजरातचं 'हे' आव्हान पूर्ण केल्याशिवाय फायनलचं तिकीट मिळणं कठीण

Ankush Dhavre

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत अनुभवी खेळाडूंसह युवा खेळाडूंनी देखील चांगली कामगिरी केली आहे. यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा आणि आकाश मधवाल सारख्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दरम्यान एक असा खेळाडू देखील आहे जो, गुजरात टायटन्स संघाकडून खेळताना मुंबई इंडियन्स संघाच्या अडचणीत वाढ करू शकतो.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज (२६ मे) क्वालिफायर २ चा सामना रंगणार आहे. या सामन्यात ५ वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स आणि गतविजेता संघ गुजरात टायटन्स संघ आमने सामने येणार आहे.

गुजरात टायटन्स संघाला क्वालिफायर १ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता अंतिम फेरीत जाण्यासाठी हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

पावलरप्लेमध्ये टिकून खेळणं मोठं आव्हान..

मुंबई इंडियन्स संघ ज्या फॉर्ममध्ये आहे, तो फॉर्म पाहता नक्कीच गुजरातच्या अडचणीत वाढ झाली असणार. मात्र या संघातील एक खेळाडू गुजरात टायटन्स संघासाठी संकटमोचक ठरू शकतो.

हा खेळाडू म्हणजे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी. त्याने पावरप्लेच्या षटकांमध्ये गुजरात टायटन्स संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे.

या हंगामात मोहम्मद शमी हा गुजरात टायटन्स संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने १५ सामन्यांमध्ये २६ गडी बाद केले आहेत. त्याने पावरप्लेच्या षटकांमध्ये घातक गोलंदाजी केली आहे. २६ पैकी १५ विकेट्स हे त्याने पावरप्लेच्या षटकांमध्ये घेतले आहेत. जे इतर गोलंदाजांच्या तुलनेत अधिक आहेत. (Latest sports updates)

रोहितच्या अडचणीत होऊ शकते वाढ..

गेल्या हंगामात देखील गुजरात टायटन्स संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोहम्मद शमीने मोलाची भूमिका बजावली होती. यावेळी तर तो जोरदार फॉर्ममध्ये आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मोहम्मद शमीला एकही गडी बाद करता आला नव्हता, कदाचित हेच गुजरातच्या पराभवाचं कारण असू शकतं. जर मुंबई इंडियन्स संघाला हा सामना जिंकायचा असेल तर सुरुवातीच्या ६ षटकात टीचून फलंदाजी करावी लागणार आहे.

मुंबई इंडियन्स संघाकडून कर्णधार रोहित शर्मा डावाची सुरुवात करण्यासाठी येतो. त्याची या हंगामातील कामगिरी पाहिली तर १० वेळा तो पावरप्लेच्या षटकांमध्ये बाद झाला आहे.

इतकेच नव्हे तर मोहम्मद शमीने त्याला दोनदा बाद केलं आहे. त्यामुळे मोहम्मद शमी सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्स संघावर दबाव टाकू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruchira Jadhav : मराठमोळा लूक अन् दाक्षिणात्य अंदाज, रुचिरा जाधवचं सुंदर फोटोशूट

Today's Marathi News Live : इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना भर सभेत शरद पवारांनी दम भरला

Beed News: ताई तुम्ही रस्ता दिला, आता गाडीही द्या; महिलेची मागणी ऐकताच पंकजा मुंडेंनी थेट फोनच लावला

PBKS vs CSK: पंजाबच्या शानदार गोलंदाजीवर जडेजाचा पलटवार! जिंकण्यासाठी ठेवलं १६८ धावांचं आव्हान

Mouni Roy : दिवसाला तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अभिनेत्री 'या' आजाराने होती त्रस्त

SCROLL FOR NEXT