mohammed shami twitter
Sports

Mohammed Shami Bowling : मोहम्मद शमीच्या 'ड्रीम बॉलने' केली लाबुशेनची दांडी गुल! VIDEO पाहायलाच हवा

Marnus Labuschagne Wicket: ऑस्ट्रेलिया संघाला मोहम्मद शमीने मोठा धक्का दिला आहे. त्याने मार्नस लाबुशेनची दांडी उडवली आहे.

Ankush Dhavre

IND VS AUS WTC 2023 FINAL: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघानी प्रवेश केला आहे.

लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला मोहम्मद शमीने मोठा धक्का दिला आहे. त्याने मार्नस लाबुशेनची दांडी उडवली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मार्नस लाबुशेन हा अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याला मोहम्मद शमीने २५ व्या षटकात पॅव्हेलियनची वाट दाखवली आहे. मार्नस लाबुशेनने ऑस्ट्रेलिया संघाला चांगली सुरुवात करून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

त्याने या डावात ६२ चेंडूंचा सामना करत २६ धावा केल्या. त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. या खेळीचं रूपांतर मोठ्या खेळीत करणार इतक्यात मोहम्मद शमीने त्याच्या खेळीला ब्रेक लावला.

शमीने उडवली मार्नस लाबुशेनची दांडी..

तर झाले असे की, लंच ब्रेक झाल्यानंतर २५ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद शमी गोलंदाजी करण्यासाठी आलेलं होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने मार्नस लाबुशेनला असा काही भन्नाट चेंडू टाकला जो, मार्नस लाबुशेनला कळालाच नाही.

टप्पा पडताच शमीचा चेंडू आत आला आणि मार्नस लाबुशेनच्या बॅट आणि पॅडच्या मधून दांडी उडवून गेला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११ :

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव,शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी,

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, नॅथन लियॉन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adinath Kothare: अदिनाथ कोठारेची दमदार एन्ट्री, 'डिटेक्टिव धनंजय' मध्ये साकारणार मुख्य भूमिका

Maharashtra Live News Update : भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील मनाने राष्ट्रवादीत; राम सातपुते यांचा खोचक टोला

Diljit Dosanjh: अमिताभ बच्चन यांच्या पाया पडणं पडलं महागात; खलिस्तानीकडून प्रसिद्ध गायकाला आणखी एक धमकी

Julie Yadav: मोबाईल घरी विसरली म्हणून पुन्हा घरी गेली आणि...! भारतीय महिला हॉकी खेळाडूचा अपघतात मृत्यू

Maharashtra Government : राज्यातील गुंठेवारीला अधिकृत परवानगी, राज्यपालांचा अध्यादेश

SCROLL FOR NEXT