Mohammed Shami
Mohammed Shami Twitter
क्रीडा | IPL

Mohammed Shami Record: याला म्हणतात क्लास! शमीने कॉनवेच्या दांड्या उडवताच नावावर झाला खास रेकॉर्ड - VIDEO

Ankush Dhavre

Mohammed Shami Clean Bowled Devon Conwey: आयपीएल २०२३ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान गुजरात टायटन्स संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

मोहम्मद शमी हा गुजरात टायटन्स संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. या सामन्यात देखील त्याच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे.

त्याने पहिल्या डावात गोलंदाजी करताना चेन्नईचा सलामीवीर फलंदाज डेव्हॉन कॉनवेची दांडी गुल केली. यासह त्याने आयपीएल स्पर्धेत १०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा करणारा तो १८ वा गोलंदाज ठरला आहे.

तसेच मोहम्मद शमीच्या या सामन्यातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ४ षटकात २९ धावा खर्च करत २९ धावा खर्च केल्या आणि २ गडी बाद केले. (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

गुजरात टायटन्स प्लेइंग ११ : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुबमन गिल,वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केन विलियमसन, विजय शंकर, राहुल तेवतिया, आर खान, मोहम्मद शमी, जोशवा लिटल, वाय दयाल आणि अल्जारी जोसेफ.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग ११: महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे महायुतीला का हवेत? महायुतीसाठी मनसे घेणार 'राज'सभा

Baba Ramdev: बाबा रामवेदांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

Gharat Ganpati : 'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

MI Vs LSG : मुंबईचा प्लेऑफचा पत्ता जवळपास कट; लखनौचा मुंबईवर ४ गडी राखून विजय

Maharashtra Tourism: सूर्य आग ओकतोय! उष्णतेच्या झळा थंड हवेच्या ठिकाणांनाही, पर्यटकांनी फिरवली पाठ

SCROLL FOR NEXT