Raj Thackeray: राज ठाकरे महायुतीला का हवेत? महायुतीसाठी मनसे घेणार 'राज'सभा

Lok Sabha Election 2024: राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली नाही. तरीही महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे 4 ते 5 सभा घेणार आहेत. 4 मेला सिंधुदुर्गात नारायण राणेंसाठी राज ठाकरेंची पहिली सभा होणार आहे.
राज ठाकरे महायुतीला का हवेत? महायुतीसाठी मनसे घेणार 'राज'सभा
Raj ThackeraySaam TV
Published On

Lok Sabha Election 2024:

राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली नाही. तरीही महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे 4 ते 5 सभा घेणार आहेत. 4 मेला सिंधुदुर्गात नारायण राणेंसाठी राज ठाकरेंची पहिली सभा होणार आहे. यानिमित्ताने महायुतीला राज ठाकरेंची गरज का भासतेय? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. 2009नंतर मनसेच्या मतांची टक्केवारी चांगलीच घसरलीय.

मनसेने पहिली विधानसभा निवडणूक 2009 ला लढवली. यावेळी 143 उमेदवारांपैकी 13 आमदार निवडून आले. पहिल्याच निवडणुकीत 5.71 टक्के मतं मिळवून राज ठाकरेंनी आपली ताकद दाखवली होती. मात्र 2014च्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार चांगलेच आपटले. 219 उमेदवारांपैकी मनसेचा फक्त 1 आमदार निवडून आला आणि मतांची टक्केवारी 3.15 वर घसरली होती. पुढे 2019च्या निवडणुकीत मनसेने 101 उमेदवारच मैदानात उतरवले. यावेळीही फक्त एकमेव उमेदवार विजयी झाला आणि मतांची टक्केवारी होती 2.25.

राज ठाकरे महायुतीला का हवेत? महायुतीसाठी मनसे घेणार 'राज'सभा
Baba Ramdev: बाबा रामदेव यांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी
राज ठाकरे महायुतीला का हवेत? महायुतीसाठी मनसे घेणार 'राज'सभा
Arvind Kejriwal: निवडणुकीपूर्वी केजरीवालांना अटक का? कोर्टाने ईडीला विचारले हे 5 प्रश्न

म्हणजेच राज ठाकरेंच्या सभांची गर्दी ईव्हीएमवरील इंजिनाच्या बटणापर्यंत पोहोचलीच नाही. अशा स्थितीतही महायुती राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी आग्रही आहे.

राज ठाकरे महायुतीसाठी महत्त्वाचे का?

आगामी लोकसभा निवडणुकीत 45हून अधिक जागा निवडून आणण्याचं महायुतीचं ध्येय आहे. यासाठी भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पाडून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना धक्का दिला. गल्लीत कार्यकर्त्यांच्या लढाईपासून दिल्लीत सुप्रीम कोर्टाच्या लढाईपर्यंत भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना बळ दिलंय. मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सहानुभूतीच्या लाटेचा फायदा होण्याची शक्यता आहे. म्हणूनच राज ठाकरे यांच्यासारख्या फायरब्रँड नेत्यांची महायुतीला गरज भासतेय.

एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर आणि अजित पवारांनी शरद पवारांवर टीका करणं सर्वसामान्यांच्या पचनी पडत नाहीये. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या तुलनेत सर्वसामान्य जनतेला पक्षफुटीचं कारण समजावणं अवघड आहे. इथेच राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची ठरते.

राज ठाकरेंच्या सभांमधून महायुतीला आपली बाजू सर्वसामान्य जनतेसमोर प्रभावीपणे मांडता येणार आहे. याशिवाय बाळासाहेबांनंतर राज ठाकरे हेच प्रखर हिंदुत्वाचा चेहरा असल्याचं भाजपला दाखवायचंय. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे राज ठाकरे सोबत आल्याने मराठी मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा महायुतीलाच होईल, असा भाजपचा अंदाज आहे. आता हे सर्व आडाखे प्रत्याक्षात कितपत खरे ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com