MI Vs LSG : मुंबईचा प्लेऑफचा पत्ता जवळपास कट; लखनौचा मुंबईवर ४ गडी राखून विजय

Mumbai Indians Vs Lucknow Super Giants/IPL2024 : आयपीएल 2024 च्या 47 व्या सामन्यातही मुंबई संघाने निराशाजनक कामगिरी केली आणि लखनौकडून सामना गमावला या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 144 धावा केल्या. लखनौने हे लक्ष्य 4 चेंडू आणि ४ गडी राखून पूर्ण केलं.
MI Vs LSG
MI Vs LSG Saam Digital
Published On

आयपीएल 2024 च्या 47 व्या सामन्यातही मुंबई संघाने निराशाजनक कामगिरी केली आणि लखनौकडून सामना गमावला या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 144 धावा केल्या. लखनौने हे लक्ष्य 4 चेंडू आणि ४ गडी राखून पूर्ण केलं. या पराभवामुळे मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडली आहे. मुंबईने आतापर्यंत 10 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत आणि 7 सामने गमावले आहेत. उर्वरित ४ सामने जिंकले तरी प्लेऑफमध्ये पोहोचणं मुंबईसाठी जवळपास अशक्य आहे.

दुसरीकडे, लखनौ संघाने 10 सामन्यांत सहावा विजय संपादन केला असून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. लखनौला प्लेऑफमध्ये पोहाचण्यासाठी ४ पैकी २ सामने जिंकावे लागतील. लखनौ सुपरजायंट्सला सहावा विजय मिळवून देण्यात मार्कस स्टॉइनिसची मोठी भूमिका होती. या ऑस्ट्रेलियन खेळाडूने गोलंदाजीत 3 षटकात 19 धावा देऊन एक बळी घेतला आणि त्यानंतर फलंदाजीत स्टोइनिसने 45 चेंडूत 62 धावा केल्या. स्टॉइनिसने 2 षटकार आणि 7 चौकार मारले आणि त्याच्या खेळीच्या जोरावर लखनौने सहज विजय मिळवला.

MI Vs LSG
India T20 World Cup Squad : किंग कोहलीवर विश्वास कायम, पंत आणि चहलचंही कमबॅक; टी-20 वर्ल्डकप टीमबाबत ५ महत्वाचे मुद्दे

मुंबई इंडियन्सच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. रोहित शर्मा केवळ 4 धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवला केवळ 10 धावा करता आल्या. टिळक वर्मालाही 7 धावा करता आल्या. कर्णधार हार्दिक पंड्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर नेहल वढेराने 41 चेंडूत 46 धावा करत मुंबईचा डाव सावरला. टीम डेव्हिडने 18 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. तर इशान किशनने 36 चेंडूत 32 धावांची खेळी केली. मुंबईच्या फलंदाजीतजी ताकद इतर संघांसोबत जी दिसली ती यावेळी दिसली नाही. याचा फायदा लखनौच्या गोलंदाजांनी घेतला. लखनौचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकने 3.5 षटकात केवळ 15 धावा देत एक बळी घेतला. रवी बिश्नोईने 4 षटकात 28 धावा देत 1 बळी घेतला.

MI Vs LSG
MI Vs LSG : लखनौच्या गोलंदाजांसमोर मुंबईचा संघ गडगडला; लखनौसमोर १४५ धावांचं लक्ष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com