Mohammad Rizwan Breaks Virat Kohli Babar Azam Record:
पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३००० धावा करणारा फलंदाज ठरलाय. रिझवानने ही कामगिरी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात केली. ३१ वर्षीय रिझवानने या सामन्यात ४५ धावांची नाबाद खेळी करत हा विक्रम केलाय. रिझवानच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर पाकिस्तानने न्यूझीलंडने दिलेले ९१ धावांचे लक्ष्य १२.१ षटकात ३ गडी गमावून पूर्ण केले.
मोहम्मद रिझवानने ७९ टी-२० आंतरराष्ट्रीय डावात तीन हजार धावा पूर्ण केल्या आहेत. हा किर्तीमान बनवतांना रिझवाने भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांचा विक्रम मोडीत काढलाय. बाबर आणि विराटने समान T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या ८१ डावात ३००० धावा पूर्ण केल्या होत्या. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा रिझवान हा एकूण आठवा फलंदाज आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे ज्याने ११७ सामन्यांमध्ये ४,०३७ धावा केल्या आहेत.
दरम्यान पाकिस्तानच्या संघाने ५ सामन्यांच्या टी२० सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतलीय. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. पहिल्या टी२० सामना फक्त दोन चेंडूचा झाला होता, तितक्या पावसाने हजेरी लावली. रावळपिंडी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात एक आश्चर्यकारक विक्रम झाला. या सामन्यात फलंदाज फलंदाजीसाठी क्रीझवर आले मात्र त्यांच्या बॅटिंगमुळे धावा झाल्या नाहीत. ज्या दोन धावा झाल्या त्या बाय होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा पहिलाच सामना होता ज्यात फलंदाजाच्या बॅटमधून एकही धाव आली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.