Mohammad Kaif Twitter
Sports

Mohammad Kaif: नाद करायचा नाय! ४२ व्या वयातही कैफने दाखवली चित्त्यासारखी चपळाई, डाईव्ह मारत टिपला भन्नाट झेल -VIDEO

Mohammad Kaif Catch: निवृत्त होऊन वर्षे झाली असली तरीदेखील मैदानावर क्षेत्ररक्षण करताना त्याचा तोच जुना अंदाज पाहायला मिळाला आहे.

Ankush Dhavre

Mohammad kaif catch video: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे.

चेंडू किती ही लांब असला तरी हा खेळाडू वाऱ्याच्या वेगाने जाऊन चेंडू अडवायचा. आता निवृत्त होऊन वर्षे झाली असली तरीदेखील मैदानावर क्षेत्ररक्षण करताना त्याचा तोच जुना अंदाज पाहायला मिळाला आहे.

मोहम्मद कैफ सध्या लेजेंड्स क्रिकेट लीग स्पर्धेत खेळताना दिसून येत आहे. या स्पर्धेत खेळताना तो फलंदाजीने तर धुमाकूळ घालतोय. तर क्षेत्ररक्षण करतानाही क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकत आहे. दरम्यान त्याने या स्पर्धेत भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

लेजेंड्स क्रिकेट लीग स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरचा सामना एशिया लायन्स आणि इंडिया महाराजा या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात इंडिया महाराजा संघाला ८५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र मोहम्मद कैफने टिपलेला झेल सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

तर झाले असे की , एशिया लायन्स संघाची फलंदाजी सुरु असताना ९ वे षटक टाकण्यासाठी प्रज्ञान ओझा गोलंदाजीला आला होता.

या षटकातील पाचव्या चेंडूवर फलंदाज उपुल थरांगाने कव्हरच्या वरून शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. कारण कव्हरला क्षेत्ररक्षण करत असलेल्या मोहम्मफ कैफने डाइव्ह मारत भन्नाट झेल टिपला.

हा सामना जिंकण्यासाठी इंडीया महाराजा संघाला १९२ धावांची गरज होती. मात्र भारतीय संघाला केवळ १०६ धावा करता आल्या. मोहम्मद कैफला देखील या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs : लक्ष्मीची पावले घरात येणार! ५ राशींचं नशीब! पुढील ७ दिवस पैशाचा वर्षाव, कामात मिळणार मोठं पद

Nagpur Earthquake: दिवाळीत नागपूर भूकंपाच्या धक्क्याने हादरले, घाबरून नागरिकांची घराबाहेर धाव

Maharashtra News Live Update: दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर तीच खऱ्या अर्थाने दिवाळी; शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे सूचक विधान

Katrina-Vicky Son: दिवाळीच्या मुहूर्तावर कतरिना-विकीने शेअर केली लेकची खास झलक; विहानच्या गोंडस फोटोने वेधलं सर्वांचं लक्ष!

Earbuds Cleaning Tips: इअरबड्स स्वच्छ कसे करायचे? जाणून घ्या 5 सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT