Earbuds Cleaning Tips: इअरबड्स स्वच्छ कसे करायचे? जाणून घ्या 5 सोप्या ट्रिक्स

Manasvi Choudhary

इअरबड्स

आजकाल इअरबड्स सर्वचजण वापरतात. प्रवासात गाणी ऐकण्यासाठी आणि ते कॉलिंगसाठी इअरबड्सचा वापर होतो.

Earbuds

इअरबड्सची स्वच्छता

परंतु, सतत इअरबड्स वापरल्याने कानातला मळ, घाम आणि धूळ इअरबड्सवर जमा होते. इअरबड्सच्या स्पीकर ग्रिलवर व सिलिकॉन टिप्सवर घाण जमा होते.

Earbuds Cleaning Tips

इअरबड्स स्वच्छ करण्याच्या 5 टिप्स

यासाठी वेळीच इअरबड्स स्वच्छ करणे महत्वाचे आहे. इअरबड्स स्वच्छ करण्याच्या 5 टिप्स जाणून घ्या.

Earbuds Cleaning Tips

मऊ आणि कोरड्या कापडाने बाहेरील भाग पुसा

मऊ, सुती कापडाने इअरबड्सचा बाहेरील भाग आणि चार्जिंग केस पुसून घ्या. यामुळे बाहेरील धूळ व हाताचे तेलकट डाग सहज निघून जातील.

Earbuds Cleaning Tips

सिलिकॉन टिप्स धुवा

जर तुमच्या इअरबड्सना सिलिकॉन किंवा रबराचे इअर टिप्स असतील, तर ते हळूच इअरबडपासून वेगळे करा. हे टिप्स कोमट पाण्यात धुवून घ्या. धुऊन झाल्यानंतर ते हवेशीर नंतर पूर्णपणे कोरडे करा.

Earbuds Cleaning Tips

स्पीकर मेष वरील मळ साफ करा

इअरबड्सच्या स्पीकर ग्रिलवरचा मळ काढण्यासाठी मऊ दातांचा ब्रश किंवा कॉटन बड वापरा.

Earbuds Cleaning Tips

चार्जिंग केसमधील धूळ साफ करा

इअरबड्सच्या खाचांमध्ये धूळ साचते, ज्यामुळे चार्जिंग पॉइंट ब्लॉक होऊ शकतात. यामुळे वाळलेल्या कॉटन बडच्या साहाय्याने केसच्या आतल्या बाजूची धूळ साफ करा.

Earbuds Cleaning Tips

दुसऱ्यांचे इअरबड्स स्वच्छ करा

कधीही दुसऱ्या व्यक्तीचे इअरबड्स थेट कानात घालू नका. जर दुसऱ्याचे इअरबड्स वापरायचे असतील, तर आधी स्वच्छ करा.

Earbuds Cleaning Tips

NEXT: Floor Cleaning Tips: झाडू मारल्यानंतरही घरात धूळ येत असेल तर काय करावे? 1 सोपी ट्रिक लक्षात घ्या

Floor Cleaning Tips
येथे क्लिक करा...