mohammad kaif ms dhoni  yandex
क्रीडा

Mohammad Kaif: 'धोनीसाठीच नियम बदलला, जोपर्यंत तो खेळतोय..' मोहम्मद कैफच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेत काही मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. आगामी हंगामापूर्वी uncapped player चा नियम लागू करण्यात आला आहे.

या नियमामुळे ज्या खेळाडूने निवृत्ती जाहीर केलीय किंवा ५ वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नसेल असे खेळाडू uncapped player कॅटेगरीमध्ये फिट बसतात. काहींचं म्हणणं आहे, हा नियम एमएस धोनीसाठी लागू करण्यात आला आहे.

हा नियम आधीपासून लागू करण्यात आला होता. मात्र २०२१ मध्ये हा नियम काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की,एमएस धोनीला आयपीएलमध्ये आणण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. धोनी २०१९ मध्ये भारतीय संघासाठी आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

त्यानंतर २०२० मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरही तो चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी आयपीएल खेळतोय. धोनीला परत आणण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने हा नियम परत लागू करण्याची मागणी केली होती. कारण धोनीला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळून ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. आयपीएल कमिटीनेही हा नियम नव्याने लागू केला आहे. दरम्यान याबाबत बोलताना भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने मोठं वक्तव्य केलं आहे.

स्टार स्पोर्ट्सवर बोलाताना मोहम्मद कैफ म्हणाला की, ' आपल्याला पुन्हा एकदा धोनीला खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. तो फिट आहे आणि तो आक्रमक फलंदाजी करतोय. यासह यष्टीच्या मागे देखील चांगली कामगिरी करतोय. तोपर्यंत तो खेळतोय, नियम बदलत राहणार. तुम्हाला नियम बदलावेच लागतील. धोनीला खेळायचंय, तर खेळू द्या. तो चेन्नईचा मॅचविनर खेळाडू आहे.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' जर तो फिट आहे, चांगली कामगिरी करतोय, तर का नाही? धोनी स्वत: म्हणालाय की, त्याला पैशांची गरज नाही. टीम मॅनेजमेंटला जे हवं आहे, तेच तो करणार. हो, त्याला ४ कोटींमध्ये रिटेन करणं जर कठीण आहे .मात्र तुमच्याकडे त्याला रिटेन करण्याची संधी आहे. जे काही असो, सर्वांना माहितीये की, धोनीमुळेच नियम बदलण्यात आला आहे. आणि को नको? धोनी आहेच त्या प्रकारचा खेळाडू.' असं मोहम्मद कैफ म्हणाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती ५०० कोटींच्या घोटाळ्यात अडकली?

Haryana Election Exit Poll Result : हरियाणात काँग्रेस ५०, भाजप १५ तर 'आप'ला शून्य जागा; एक्झिट पोलची आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

२ चिमुकली मुलं, अंबरनाथमधून गायब, कल्याणमधून अपहरण अन् पालघरला थरार...

National Park: प्राणी प्रेमींनो! भारतातील 'ही' राष्ट्रीय उद्याने पाहिलीत का?

SCROLL FOR NEXT