आशिया चषक २०२३ स्पर्धेत मंगळवारी आतापर्यंतचा सर्वात रोमांचक सामना पाहायला मिळाला. श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने जवळ जवळ सुपर ४ फेरीत प्रवेश केलाच होता.
मात्र शेवटी श्रीलंकेने दुहेरी धक्का देत अफगाणिस्तावर २ धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर अफगाणिस्तानचे खेळाडू निराश असल्याचे पाहायला मिळाले आहे.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २९१ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानला सुपर ४ मध्ये प्रवेश करण्यासाठी हे आव्हान ३७.१ षटकात पूर्ण करायचे होते. मुख्य बाब म्हणजे अफगाणिस्तानने जवळ जवळ हे आव्हान गाठलं होतं. ३७ षटकांचा खेळ संपल्यानंतर अफगाणिस्तानने ८ गडी बाद २८९ धावा केल्या होत्या.
अफगाणिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी केवळ ३ धावांची गरज होती. मात्र पहिल्याच चेंडूवर मुजीब उर रहमान बाद झाला. यासह अफगाणिस्तानचं सुपर ४ मध्ये प्रवेश करण्याचं स्वप्न भंगलं. या पराभवानंतर नॉन स्ट्राइकला असलेला राशिद खान देखील निराश झाला. (Latest sports updates)
३७.१ षटकानंतरही अफगाणिस्तानला होता चान्स..
अफगाणिस्तानला असं वाटलं होतं की, त्यांचा सुपर ४ मध्ये जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. इथेच अफगाणिस्तानकडून मोठी चूक झाली. अफगाणिस्तानला ३७.१ षटक झाल्यानंतरही सुपर ४ मध्ये प्रवेश करण्याची संधी होती. यासाठी ३८ व्या षटकातील चौथ्या चेंडूपर्यंत अफगाणिस्तानला २९५ धावा करायच्या होत्या.
तर राशिद खानला स्ट्राईक मिळाली असती.तर त्याने षटकार मारून अफगाणिस्तानला सुपर ४ चं तिकीट मिळवून दिलं असतं.
जर अफगाणिस्तानने षटकातील पाचव्या चेंडूवर २९५ धावा केल्या असत्या तर श्रीलंका आणि अफगाणिस्तानचा रनरेट सारखा झाला असता.त्यामुळे सुपर ४ मध्ये कोण जाणार याचा निर्णय नाणेफेक करून केला गेला असता.
या सामन्यात धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने सुरूवातीपासूनच अफगाणिस्तानवर दबाव बनवून ठेवला होता. मात्र विजयाच्या अगदी जवळ असताना अफगाणिस्तानला हा सामना गमवावा लागला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.