IND VS PAK: 'मैत्री मैदानाबाहेर, मैदानात फक्त..' IND-PAK खेळाडूंना गप्पा मारताना पाहून गंभीर, विराटसह संपूर्ण संघावर भडकला

Gautam Gambhir Angry On Team India: खेळाडूंचं हे वागणं पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर भडकला आहे.
Gautam gambhir
Gautam gambhirsaam tv

Gautam Gambhir On Team India:

आशिया चषकातील तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तान संघाला विजयासाठी २६७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही.

त्यामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान सामना रद्द झाल्यानंतर खेळाडू एकमेकांची भेट घेताना दिसून आले होते.

हे पाहून अनेकांनी खेळाडूंचं कौतुक केलं आहे. तर खेळाडूंचं हे वागणं पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर भडकला आहे.

Gautam gambhir
IND vs PAK, Asia Cup 2023: रोहित- कोहलीला बाद करण्यासाठी काय होता आफ्रिदीचा मास्टरप्लान? स्वतःच केला खुलासा

भारत पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा आमने सामने येतात तेव्हा आग ही दोन्ही बाजूने लागलेली असते. क्रिकेट चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पहायला मिळत असतो. मैदानावर खेळाडू एकमेकांना डिवचताना दिसून येत असतात.

मात्र या सामन्यात असं काहीच पाहायला मिळालं नाही. सामन्यापूर्वी आणि सामन्यादरम्यान देखील खेळाडू एकमेकांसोबत मजेशीर गप्पा मारताना दिसून आले. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, 'जेव्हा राष्ट्रीय संघासाठी खेळण्यासाठी आपण मैदानावर उतरतो त्यावेळी मैत्री ही मैदानाच्या बाहेर ठेवायला हवी. दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये ती आक्रमकता असायला हवी. तुम्ही ६-७ तास क्रिकेट खेळून झाल्यानंतर मैत्री निभावू शकता. हे काही तास खूप महत्वाचे असतात. कारण तुम्ही केवळ स्वत:चे नव्हे तर १४० कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करताय.' (Latest sports updates)

Gautam gambhir
Virat Kohli Female Fan Viral Video: शेजाऱ्यांवर प्रेम करणं चुकीचं नाही... तरुणीचं विराट प्रेम पाहून पाकिस्तानी फॅन्सचा तिळपापड

तसेच तो पुढे म्हणाला की, 'आज कल खेळाडू एकमेकांची खिल्ली उडवताना दिसून येत असतात. काही वर्षांपूर्वी असं काहीच पाहायला मिळत नव्हतं. तुम्ही तर फ्रेंडली सामना खेळताय.' गौतम गंभीर हा फलंदाजीसह आपल्या आक्रमकतेसाठी देखील ओळखला जायचा. २०१० आशिया चषक स्पर्धेत जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते त्यावेळी कामरान अकमल आणि गौतम गंभीर हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. एमएम धोनीने मध्यस्ती केल्याने हा वाद थांबला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com