Mirabai Chanu Gold Medal In Commonwealth Games 2026 
Sports

भारताच्या 'गोल्डन क्वीन'ची हॅटट्रिक! मीराबाई चानूनं मिळवलं सलग तिसरं सुवर्ण पदक; कॉमनवेल्थ बनवला नवा विक्रम

Commonwealth Games 2026: भारताची ऑलिम्पिक पदकविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने सलग तिसरे सुवर्णपदक पटकावत नवा इतिहास रचला आहे.

Bharat Jadhav

  • मीराबाई चानूने सलग तिसरे सुवर्णपदक जिंकले

  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूचा नवा विक्रम

  • ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे पहिले सुवर्णपदक

भारतीय वेटलिफ्टिंगची क्वीन म्हटलं जाणारी साखोम मीराबाई चानूने सुवर्ण पदक जिंकून लाखो भारतीयांची अपेक्षा पूर्ण केलीय. यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक, तर पहिले सुवर्णपदक ठरलंय. ग्लास्गो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी मीराबाई चानूने सुवर्ण पदक जिंकत देशाचा झेंडा उंचावलाय.

मीराबाई चानूने २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४८ किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदक जिंकलंय. . मीराबाईने याआधी २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट आणि २०२२ मध्ये बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली होती. आता ग्लास्गोमध्येही तिने सलग तिसरे सुवर्ण जिंकलंय.

स्नॅच प्रकारात मीराबाईने ८२ किलो वजनाने सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात ती अपयशी ठरली. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात तिने यशस्वीरीत्या ८२ किलो वजन उचलले. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात ८५ किलो वजन उचलत स्नॅच प्रकारात नवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा विक्रम प्रस्थापित केला आणि अव्वल स्थान मजबूत केलं. क्लीन अँण्ड जर्कमध्ये १०५ किलो वजनासह सुरुवात करताना ती पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरली. पण दुसऱ्या प्रयत्नात तिने हा निर्णयही सार्थ ठरवत सलग तिसऱ्या सुवर्ण पदक जिंकलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT