बालेवाडीच्या 5 कोटींच्या सिंथॅटिक ट्रॅकवर मंत्र्यांच्या गाड्या - Gopal Motghare
Sports

बालेवाडीच्या 5 कोटींच्या सिंथॅटिक ट्रॅकवर मंत्र्यांच्या गाड्या.. (पहा व्हिडिओ)

गोपाळ मोटघरे

पुणे : हे शहर क्री़डा नगरी Sports City म्हणून ओळखली जाते. मात्र, याच क्रीडा नगरीत असलेल्या क्रीडा संकुलातल्या महागड्या सिंथॅटिक अॅथलॅटिक्स Athletics ट्रॅकवर आज मंत्र्यांच्या गाड्या उभ्या करण्याची करामत सरकारी अधिकाऱ्यांनी करुन दाखवली. एका बाजूला देश आॅलिंपिक Olympics खेळाडू घडविण्याची भाषा करत असताना दुसरीकडे असा प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. Ministers Vehicles Parked on Athletics Track at Balewadi Stadium

पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी परिसरात उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार Sunil Kedar आणि राज्यमंत्री अदिती तटकरे Aditi Tatkare दाखल झाले होते. तेव्हा त्यांच्या गाड्यांचा ताफा चक्क मुख्य अॅथलेटिक्स स्टेडियमच्या ट्रॅकवर उभा करण्यात आल्या होत्या, शासकीय क्रीडा अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे हा  प्रताप घडून आल्याने क्रीडा क्षेत्रातुन संताप व्यक्त केला जातो आहे. 

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुमारे 5 कोटी रुपये खर्च करून आंतराष्ट्रीय दर्जचा सिंथेटिक ट्रॅक उभारला गेला आहे. खेळाडूंच्या सरावा व्यतिरिक्त इथे पायी चालण्याचीही परवानगी नसते, हे माहीत असून देखील, आलेल्या मंत्र्यांचे दोन मजले चढण्याच श्रम वाचावं आणि आपल्याला शाब्बासकी मिळावी यासाठी क्रीडा अधिकाऱ्यांनी केलेल्या या करामतीमुळे क्रीडा विभागाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 

या आधी आजी माजी राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय क्रीडा मंत्री अशा अनेकांनी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मुख्य अॅथलेटिक्स स्टेडियमला भेट दिली आहे. मात्र कोणीच  अॅथलेटिक्स ट्रॅकवर व्हीआयपींच्या गाड्या उभ्या केल्या नव्हत्या. Ministers Vehicles Parked on Athletics Track at Balewadi Stadium

याबाबत क्रीडा संकुलातील क्रीडा अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी हात वर केले. मात्र क्रीडामंत्री सुनील केदार यांनी मात्र ह्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे.  क्रीडांगणाचा वापर राजकीय कार्यक्रम, समारंभासाठी न होता ते खेळासाठीच वापरले जातील, मात्र हे सगळं क्रीडा विद्यापीठ सुरू झाल्यावर होईल असे सांगत  सुनील केदार यांनी सारवासारव केली.

Edited By - Amit Golwalkar

Weather Update: पुढील सात दिवस पावसाचे; महाराष्ट्रासह 'या' राज्यात धुवाँधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Live News Update : ठाकरे बंधु एकत्र आले तरी त्यांचा पराभव निश्चित आहे - मंत्री जयकुमार गोरे

निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा एल्गार; 'या' दिवशी आयोगाविरोधात काढणार विराट मोर्चा|VIDEO

Trendy Blouse Design: सणासाठी साडी नेसायची असेल तर, असे ब्लाउज आत्ताच तयार करा

Diwali 2025: नरक चतुर्दशीला कारिट फळ का फोडतात? कारणे आहे खास

SCROLL FOR NEXT