MI VS RCB Wankhede Stadium x
Sports

MI Vs RCB : मुंबई इंडियन्सचीच हवा, दहा वर्षात एकदाही वानखेडेवर आरसीबी जिंकली नाही

MI Vs RCB Head to Head In Wankhede Stadium : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना खेळला जाणार आहे. घरच्या स्टेडियमवर खेळत असल्याने या सामन्यामध्ये मुंबईचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

MI Vs RCB Head to Head : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा आयपीएल २०२५ मधील २० वा सामना आज मुंबईत रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई-आरसीबी आमनेसामने येणार आहेत. वानखेडेमधील शेवटचा सामना मुंबईने जिंकला होता. त्यामुळे आजच्या सामन्यादेखील मुंबईचा विजय होईल अशी चाहत्यांना आशा आहे.

हेड-टू-हेट रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासामध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ तब्बल ३३ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यातील १९ सामन्यांमध्ये मुंबईचा विजय झाला आहे. तर बंगळुरूच्या संघाने १४ सामने जिंकले आहेत. वानखेडे स्टेडियममध्ये मागील १० वर्षांपासून आतापर्यंत एकदाही आरसीबीला विजय मिळवता आलेला नाही.

आयपीएल २०२५ मधला आजचा सामना वानखेडे म्हणजेच मुंबई इंडियन्सच्या घरच्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे. २०१५ मध्ये बंगळुरूने मुंबईचा वानखेडेवर पराभव केला होता. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच तब्बल १० वर्षात वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्धचा एकही सामना बंगळुरूने जिंकलेला नाही.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वामध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्सने ४ सामन्यांमधील फक्त १ सामना जिंकला आहे. केकेआर विरुद्ध वानखेडेमध्ये खेळताना मुंबईने हा विजय मिळवला आहे. आज जसप्रीत बुमराहने मुंबईच्या संघात पुनरागमन करणार आहे. याचा फायदा होऊन मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२५ मधील दुसरा सामना जिंकता येईल असे म्हटले जात आहे.

दुसऱ्या बाजूला रजत पाटीदारच्या नेतृत्वामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे पाहायला मिळते. आरसीबीने एकूण तीन सामने खेळले आहेत. यातील दोन सामने बंगळुरूने जिंकेल आहेत. तर एका सामन्यात त्यांचा पराजय झाला आहे. सध्या पॉईंट्स टेबलवर बंगळुरू तिसऱ्या स्थानी आहे, तर मुंबई आठव्या स्थानावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT