MI Vs PBKS Qualifier 2 x
Sports

MI Vs PBKS : सूर्या-तिलकची भागीदारी, नमन धीरची फटकेबाजी अन् मुंबईचा डाव २०० पार! पंजाबसमोर 'इतक्या' धावांचे लक्ष्य

MI Vs PBKS Qualifier 2 : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या क्वालिफायर २ सामन्याच्या सुरुवातीला पाऊस पडला. पावणे दहाच्या सुमारास सामना सुरु झाला. सामना सुरु झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सचा डाव २०० पार गेला.

Yash Shirke

IPL 2025 मधील दुसरा क्वालिफायर सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये रंगला आहे. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच पावसाची एन्ट्री झाली. पाऊस थांबल्यानंतर सामन्याला सुरुवात झाली. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी केली. २० ओव्हर्समध्ये मुंबईच्या शिलेदारांनी २०३ धावा केल्या. आता पंजाबला फायनल गाठण्यासाठी २०४ धावा कराव्या लागणार आहेत.

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याचा टॉस पंजाब किंग्सने जिंकला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरु होणार इतक्यात पाऊस सुरु झाला. ७.३० ला सुरु होणारा सामना ९.४५ ला सुरु झाला. त्यानंतर मुंबई इंडियन्सचे सलामीवीर फलंदाजीसाठी मैदानात उतरले.

रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो यांनी संयमी सुरुवात केली. हळूहळू जोर वाढवत फटकेबाजी करायला सुरुवात केली. ८ धावा करुन रोहित शर्मा माघारी परतला. तिलक वर्मा तिसऱ्या क्रमावर खेळायला आला. रोहित लवकर बाद झाल्याने तिलकने जॉनीला साथ दिली. चुकीचा शॉट खेळत बेअरस्टो कॅचआउट झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी खेळ सावरला. दोघांनी प्रत्येकी ४४ धावा करत मधल्या ओव्हर्समध्ये जबाबदारी सांभाळली.

सूर्या आणि तिलक बाद झाल्यानंतर नमन धीर आणि हार्दिक पंड्या ही जोडी मैदानात उतरली. शेवटच्या ओव्हर्समध्ये दोघांनी परिस्थितीनुसार खेळ केला. हार्दिक पंड्या १५ धावांवर बाद झाला. हार्दिकनंतर नमन धीरने पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. २०५ च्या स्ट्राईक रेटने नमन धीरने १८ चेंडूत ३७ धावा केल्या.

दुसऱ्या बाजूला, पंजाबकडून मार्कस स्टॉयनिसने पहिली विकेट घेतली. विजयकुमार वैशाखच्या ओव्हरमध्ये जॉनी बेअरस्टो बाद झाला. मधल्या ओव्हर्समध्ये विकेट पडली नाही. चौदाव्या ओव्हरमध्ये युजवेंद्र चहलने सूर्याला, पंधराव्या ओव्हरमध्ये काइल जेमिसनने तिलक वर्माला माघारी पाठवले. अजमातुल्ला ओमरझाईच्या ओव्हरमध्ये फटका मारताना कॅप्टन पंड्या कॅचआउट झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये ओमरझाईने नमन धीरला बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : धुक्याने घात केला! प्रवाशांनी भरलेल्या बसचं नियंत्रण सुटलं अन् बस थेट दरीत कोसळली; ९ जणांचा मृत्यू, २६ जखमी

Shirdi One Day Trip: वंदे भारतचा गारेगार प्रवास, सकाळी मुंबईत, दुपारी साई बाबांच्या दारात, वाचा खर्च अन् ट्रेनचा टायमिंग

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची राजकीय दौऱ्याची सुरूवात, साताऱ्यात यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी नतमस्तक

मुंबईहून पुण्याला फक्त ४८ मिनिटात, केंद्र सरकारची मोठी घोषणा, वाचा काय होणार फायदा

40 वर्षाखालील तरुणांना कॅन्सरचा धोका; पोटासंबंधीत 'ही' लक्षणे दुर्लक्षित करु नका, Colorectal Cancer म्हणजे काय?

SCROLL FOR NEXT