mi vs pbks  saam tv
Sports

MI VS PBKS Preview: मुंबईच्या फॅन्सची चिंता वाढवणारी बातमी! एकहाती सामना फिरवणारा पंजाबचा वाघ आज करू शकतो कमबॅक

Shikhar Dhawan Comeback: मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज (MI vs PBKS) हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

MI VS PBKS Playing 11: आयपील २०२३ स्पर्धेत आज डबल हेडर (Double Header) सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज (MI vs PBKS) हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. मुंबई इंडियन्स संघाने गेल्या सामन्यात जोरदार विजय मिळवला होता. तर पंजाब किंग्ज संघाला गेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

मुंबईने आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत यापैकी ३ सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवता आला आहे. तर २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पंजाबने ६ सामने खेळले आहेत. यापैकी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ३ सामन्यांमध्ये पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हा सामना आज संध्याकाळी ७:३० वाजता वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. मात्र पंजाबची चिंता वाढवणारी बातमी म्हणजे शिखर धवन आज खेळणार का? कारण गेल्या २ सामन्यांपासून शिखर धवन दुखापतीमुळे खेळू शकला नाहीये. जर तो आज फलंदाजी करण्यासाठी आला तर नक्कीच पंजाबची फलंदाजी आणखी मजबूत होऊ शकते. तसेच मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला देखील घरच्याच मैदानावर विजय मिळवण्यासाठी जोरदार कामगिरी करावी लागणार आहे. (MI vs PBKS Match Prediction)

रोहित, सूर्याला सुर केव्हा गवसणार?

पंजाब किंग्ज संघाचा फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) ४ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना २३४ धावा केल्या आहेत. तर मुंबई इंडियन्स संघाकडून फलंदाजी करताना तिलक वर्माने (Tilak Verma) अप्रतिम फलंदाजी केली आहे. त्याने ५ सामन्यांमध्ये २१५ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने (Rohit Sharma)एका सामन्यात अर्धशतक झळकावत सामना जिंकून दिला होता. मात्र तो सातत्य टिकवून ठेवण्यात अपयशी ठरतोय. तर दुसरीकडे सूर्यकुमार यादवला (Suryakumar yadav) अजूनही सुरू गवसलेला नाहीये. (Latest sports updates)

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग 11 (Mi vs PBKS Playing 11):

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians Playing 11) :

इशान किशन, रोहित शर्मा(कर्णधार), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, जेसन बेहरेनडॉर्फ, हृतिक शोकेन, अर्जुन तेंडुलकर(Arjun Tendulkar), रिले मेरेडिथ, पियुष चावला

पंजाब किंग्स (Punjab Kings Playing 11):

अथर्व तायडे/शिखर धवन, हरप्रीत भाटिया, लियाम लिव्हिंगस्टोन, सिकंदर रझा, जितेश शर्मा, शाहरुख खान, सॅम करन, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चहर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघाच्या वादात राहुल गांधींची उडी; भाजपवर मतांची चोरी केल्याचा आरोप

Jai Shree Ram Movie: अयोध्येतील राम मंदिरानंतर पाकिस्तानमध्ये काय घडलं? प्रविण तरडेंच्या 'जय श्री राम'मधून उलगडणार कहाणी

Gold Rate Today: दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोनं महागलं, १० तोळ्याच्या दरात ३२,२०० रुपयांची वाढ; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर

ACB raid: झेडपीच्या लाचखोर अधिकाऱ्याच्या घरात सापडलं ५.१६ कोटींचं घबाड, एसीबीकडून २.५ किलो सोनं अन् ११.६ किलो चांदी जप्त

Sleep Hiccups : रात्री उचकी लागून झोपमोड होतेय? दुर्लक्ष करू नका! शरीर देतेय 'या' आजाराचे संकेत

SCROLL FOR NEXT