MI VS PBKS IPL 2023 Twitter/IPL
Sports

MI VS PBKS IPL 2023: सर्वात महागड्या खेळाडूने केली मुंबईची धुलाई; पंजाबची २१४ धावांपर्यंत मजल

MI VS PBKS IPL 2023: वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाबच्या संघाने तुफान फलंदाजी केली. पंजाबच्या संघाने मुंबई इंडियन्सला २१५ धावांचे आव्हान दिलं आहे.

Vishal Gangurde

MI VS PBKS IPL 2023: मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स संघादरम्यान यंदाच्या आयपीएलच्या हंगामाचा ३१ वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाबच्या संघाने तुफान फलंदाजी केली. पंजाबच्या संघाने मुंबई इंडियन्सला २१५ धावांचे आव्हान दिलं आहे. (Latest Marathi News)

पंजाब किंग्सने पहिल्या षटकात ५ धावा कुटल्या. पंजाबला मॅथ्यूला ११ धावांवर बाद झाला. पीयूष चावलाने झेलबाद केले. त्यानंतर संघ दबावात आला. मॅथ्यू बाद झाल्यानंतर प्रभसिमरन सिंहने डाव सांभाळला. मात्र, अवघ्या २६ धावा करत प्रभासिमरन माघारी परतला. अर्जुन तेंडुलकरने प्रभासिमरनला बाद केले.

मुंबईने पंजाबला लिव्हिंगस्टोनच्या रुपाने तिसरा धक्का दिला. लिव्हिगस्टोनने अवघ्या १० धावा कुटल्या. अथर्व तायडेच्या रुपात पंजाबला चौथा धक्का बसला. अथर्व तायडे २९ धावा करत तंबूत परतला. अथर्वने ३ चौकार आणि १ षटकार लगावला.

हरप्रित आणि सॅम खेळपट्टीवर असताना १२ षटकात ८९ धावा झाल्या होत्या. दोघांनी संघाची कमान सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, १७ व्या षटकात हरप्रीत ४१ धावांवर बाद झाला. हरप्रीत आणि सॅमने ९२ धावांची भागिदारी केली.

मुंबई इंडियन्सच्या जोफ्रा आर्चरने सॅमला ५५ धावांवर बाद केले. तर जितेशला बेहरनडॉर्फने बाद केले. पंजाब किंग्सने २० षटकात २१४ धावा कुटल्या. त्यामुळे पंजाबने मुंबईला जिंकण्यासाठी २०१५ धावांचे आव्हान दिले आहे. शेवटच्या काही षटकात जितेश शर्मा आणि हरप्रीत भाटियाने संघासाठी मोठं योगदान दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्तर प्रदेशात निवडणुकीची तयारी नेमकी कुठपर्यंत? आयोग घेणार 18 जिल्ह्यांचा आढावा

Maharashtra News Live Update: Mumbai: सांगली जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ९४ टक्के मतदानाची नोंद.

५ मिनिटांत एकाच रस्त्यावर १४ अपघात; मुंबईतील घटनेने खळबळ

Home Decor : घरात बसवा या रंगाच्या टाईल्स, साफ-सफाई टेन्शनच होईल दूर

Fridge Cleaning Tips: दिवाळीआधी घरातील फ्रिज कसा स्वच्छ करायचा? सोप्या 5 टिप्स जाणून घ्या

SCROLL FOR NEXT