Mumbai Indians beat Kolkata by 5 wickets saam tv
Sports

MI vs KKR: सूर्या चमकला! इशान किशनला सूर गवसला! मुंबईचा कोलकातावर 5 विकेटने दमदार विजय

IPL 2023, MI vs KKR: मुंबईचा कोलकात्याविरुद्ध दमदार विजय, मुंबईच्या फलंदाजांना फॉर्म सापडला.

Chandrakant Jagtap

Kolkata Knight Riders vs Mumbai Indians : मुंबईच्या वानखेडेच्या स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या आयपीलएलचा 22 वा सामना खेळवला गेला. या सामन्यता मंबईने कोलकाताविरुद्ध 5 विकेटने दमदार विजय मिळवला.

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने व्यंकटेश अय्यरच्या दमदार शतकाच्या जोरावर 6 गड्यांच्या बदल्यात मुंबईसमोर विजयासाठी 186 धावांचे लक्ष्य ठेवले. हे लक्ष्य मुंबईने 5 गड्यांच्या बदल्यात आणि 17.4 षटकांत पूर्ण केले.

लक्षाचा पाठलाग करताना मंबईने दमदार सुरुवात केली. अवघ्या चार षटकात मुंबईने एकही विकेट न गमावता 47 धावा केल्या. मात्र त्यानंतर पाचव्या षटकात 65 च्या स्कोअरवर सुयश शर्माच्या चेंडूवर तो 13 चेंडूत 20 धावा करून झेल देऊन बाद झाला.दुसऱ्या टोकाला आक्रमकपणे खेळणाऱ्या इशान किशनने अवघ्या 25 चेंडूच 58 धावा करून बाद झाला. त्याच्या या खेळीत 5 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.

यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी संघाचा स्कोअरबोर्ड हलता ठेवला. तिलक वर्मा 25 चेंडूत 30 धावा करून बाद झाला. दरम्यान गेल्या काही सामन्यांपासून मोठा स्कोअर करण्यात अपयशी ठरलेल्या सूर्यकुमार यादवला देखील या सामन्यात फॉर्म सापडला त्याने 25 चेंडूत 43 धावा केल्या. यानतंर आलेल्या टीम डेव्हिडने आक्रमक खेळी करत 13 चेंडूत 24 धावा करून मुंबईला विजय मिळवून दिला.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन:

इशान किशन (विकेटकीप), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार ), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, पियुष चावला, दुआन जॅनसेन, रिले मेरेडिथ

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन:

रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT