Harmanapreet kaur and meg lanning  Saam Tv
Sports

DC vs MI WPL 2023 Final : आज रंगणार अंतिम सामन्याचा थरार! कधी, कुठे अन् कसा पाहायचा हे जाणून घ्या?

MI-W VS DC-W Final: आज विमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना पार पडणार आहे

Ankush Dhavre

Mumbai Indians Vs Delhi Capitals WPL FINAL 2023: आज विमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना पार पडणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

दोन्ही संघांनी ८ पैकी ६-६ सामने जिंकले आहेत. मात्र दिल्लीचा रन रेट चांगला असल्याने दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिला आणि अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला.

विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील अंतिम सामना कुठे, कधी आणि किती वाजता खेळला जाणार आहे.

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील अंतिम सामना आज संध्याकाळी ७:३० वाजता मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर पार पडणार आहे.

महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण कोठे केले जाईल?

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स १८ चॅनलवर होणार आहे.(Latest sports upates)

तसेच तुम्ही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स www.saamtv.com वर मिळवू शकता. (WPL 2023 final Delhi Capitals vs Mumbai Indians)

गोलंदाजांच्या कामगिरीबद्द्ल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्स संघाकडून साइका ईशाकने १५ गडी बाद केले आहेत. तर दिल्ली संघाकडून शिखा पांडेने १० गडी बाद केले आहेत.

दिल्ली कॅपिटल्स संघातील फलंदाज सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहेत. आक्रमक फलंदाज मेग लेनिंग आणि शफाली वर्मा यांनी आतापर्यंत जोरदार कामगिरी केली आहे. लेनिंगने ८ सामन्यांमध्ये ३१० धावा केल्या आहेत.

तर शफाली वर्माने २४१ धावा केल्या आहेत. तर मुंबई इंडियन्स संघातील फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, नॅट सिवर ब्रंटने आतापर्यंत जोरदार कामगिरी केली आहे. तिने ९ सामन्यांमध्ये २७२ धावा ठोकल्या आहेत.

ती या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी तिसरी फलंदाज आहे. तर हेली मॅथ्यूजने ९ सामन्यांमध्ये २५८ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

SCROLL FOR NEXT