Mumbai Indians vs Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीगच्या 12व्या सामन्यात मुंबई आणि चेन्नई भिडणार आहे. या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यासाठी दोन्ही संघांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
आज संध्याकाळी 7.30 वाजता मुंबई इंडियन्स आयपीएल 2023 चा आपला दुसरा सामना कट्टर विरोधी संघ चेन्नई सुपर किंग्जसमोर खेळेल. तेव्हा त्यांच्या नजरा मुंबईच्या पहिल्या विजयाकडे असतील. त्यामुळे या दोन्ही संघांचे चाहते या सामन्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. दोन्ही संघांचा शेवटचा हंगाम निराशाजनक होता आणि यावेळी दोन्ही संघांना आपल्या चाहत्यांना आनंदाने नाचण्याची संधी द्यायची आहे. त्यामुळे आजचा सामना नेहमीप्रमाणे हायव्होल्टेज होणार यात शंका नाही.
धोनीकडे हुमकाचा एक्का
दोन्ही संघ केवळ लीगमध्येच नव्हे तर बाद फेरीतही अनेकवेळा आमनेसामने आले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना एकमेकांच्या कमतरता आणि ताकदीबद्दल माहिती आहे. परंतु असेही काही खेळाडू आहेत जे संघांशी नव्याने जोडले गेले आहेत आणि ते कोणत्याही विरोधी संघासाठी धोका बनू शकतात.
धोनीच्या संघातील दक्षिण आफ्रिकेचा सिसांडा मगाला हा अशी खेळाडू आहे ज्याचा सामना खूप कमी फलंदाजांनी केला आहे. अशा परिस्थितीत तो धोनीचा हुकमाचा एक्का ठरू शकतो असे मानले जात आहे. रोहित, सूर्या आणि ईशानसारख्या फलंदाजांना तो अडचणीत आणू शकतो.
दुसरीकडे मुंबईच्या संघात कॅमेरून ग्रीन आणि जोफ्रा आर्चर यांचा समावेश आहे. हे दोन्ही गोलंदाज या सामन्यात काय करू शकतात हे संपूर्ण जगाला माहीत आहे. भारतीय खेळपट्ट्यांवरही आर्चर 150 पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करू शकतो. याशिवाय रोहितची बॅट वानखेडेवर तळपल्यास त्याची एकच खेळी चेन्नईला उद्धवस्त करू शकते.
स्टार खेळाडूंची फौज
या सामन्यात अनेक स्टार खेळाडू एकत्र खेळताना दिसणार आहेत. मुंबईच्या संघात रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, टीम डेव्हिड आणि जोफ्रा आर्चर आहे, तर चेन्नई सुपर किंग्जकडे डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, एमएस धोनी आणि दीपक चहर यांसारखे खेळाडू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.