Lionel Messi India tour fan reaction Saam Tv
Sports

12 हजारांचं तिकीट, पण पदरी निराशाच; मेस्सीमुळे कोलकत्यात गोंधळ

Angry Messi Fans Create Ruckus: मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी कोलकत्यामध्ये गर्दी करणाऱ्या चाहत्यांची घोर निराशा झालीय... कोलकत्यातील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये नेमकं काय घडलं? मेस्सीचे चाहते आक्रमक का झालेत?

Suprim Maskar

हा राडा झालाय... कोलकत्याच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये...फुटबॉल विश्वातील लोकप्रिय खेळाडू लिओनेल मेस्सी भारताच्या दौऱ्यावर आलाय.. मेस्सीच्या दर्शनासाठी चाहत्यांनी विमानतळापासून कोलकत्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमपर्यंत एकच गर्दी केली.... स्टेडियममध्ये जाऊन मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांनी 12 हजारांचं तिकिट विकत घेतलं....

मात्र स्टेडियमध्ये आल्यानंतर मेस्सी काही मिनटातच तिथून निघून गेल्यानं चाहत्यांची घोर निराशा झाली... अनेकांना मेस्सीचा चेहराही नीट पाहाता आला नाही... आणि फुटबॉल विश्वातील या हिरोनं केलेल्या घोर निराशेमुळे चाहत्यांनी एकच राडा केला... स्टेडियममध्ये हाताला मिळतील त्या वस्तु उचलून फेकून देत... चाहत्यांनी थेट मैदानाच गाठलं....

दरम्यान 14 डिसेंबरला मेस्सी मुंबईतल्या वानखेडे स्टेडियममध्ये येतोय...आता कोलकत्यामधील मेस्सीच्या चाहत्यांनी घातलेला राडा पाहता... मुंबईतही सुरक्षा व्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय.... मेस्सीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मुंबईही गर्दी होणार, हे निश्चित... मात्र या गर्दीचं व्यवस्थापन आणि चाहत्यांचा उत्साह कायम ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कोणती खबरदारी घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

Sunday Horoscope : लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Kolhapur IT Park: कोल्हापुरात होणार आयटीपार्क, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी

कर्नाटकात भाकरी फिरणार; शिवकुमार मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

हाताने उखडला डांबरी रस्ता, ग्रामस्थांचा ठेकेदाराविरोधात संताप

SCROLL FOR NEXT