Mary kom divorce x
Sports

Mary Kom : मेरी कोम पुन्हा प्रेमात? बॉक्सरला करतेय डेट? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Mary Kom News : भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमच्या खासगी आयुष्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मेरी आणि तिचा पतीला ओनलर लग्नाच्या २० वर्षांनंतर आता घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Yash Shirke

Mary Kom Dating News : भारताची महिला बॉक्सर मेरी कोमचे खासगी आयुष्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मेरी कोम आणि तिचा पती ओनलर लवकरच विभक्त होणार असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. २००५ मध्ये दोघे विवाहाच्या बंधनांमध्ये अडकले होते. आता २० वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेऊन वेगळे राहण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा होत आहेत. एका रिपोर्टनुसार, मेरी दुसऱ्या एका व्यक्तीला डेट करत आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, मेरी कोमचा पती ओनलर २०२२ च्या मणिपूर विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झाला होता. निवडणूकीच्या कालावधीत मेरी आणि ओनलर यांचे २ ते ३ कोटी रुपये खर्च झाले होते. याच कालावधीत मेरी आणि ओनलर यांच्यातील अंतर वाढू लागले. त्यानंतर मेरी कोम फरीदाबाद येथे एकटी राहू लागली. तर तिचा पती ओनलर दिल्लीमध्ये राहू लागला.

निवडणूक लढवण्याचा निर्णय मेरी कोमचा होता. ओनलरला यात रस नव्हता. मणिपूरची तेव्हाची परिस्थिती पाहता निवडणूक लढवणे योग्य नसल्याचे ओनलरने मेरीला सांगितले होते. तरीही ओनलर निवडणूक लढला आणि अपयशी ठरला. ओनलरचा पराभव मेरीच्या जिव्हारी लागला. यातूनच वाद वाढत गेल्याचे हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका बॉक्सरने मेरी कोम आणि ओनलर यांच्या घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या असू शकतात अशी माहिती दिली. या सूत्राने हिंदुस्तान टाईम्सला 'मेरी कोम एका बॉक्सरला डेट करत आहे' अशी माहिती दिली आहे. या सर्व प्रकरणामुळे मेरी कोम आणि तिचा पती ओनलर सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : भाजीत केस आढळल्याने नवऱ्याकडून बेदम मारहाण, २५ वर्षीय विवाहितीतेची आत्महत्या; संभाजीनगर हादरले

युद्ध पुन्हा धुमसलं; इस्त्रायलच्या भीषण हल्ल्यात २५४ जणांचा मृत्यू,भारताचंही टेन्शन वाढलं

Maharashtra News Live Update: मुंबई–अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, टँकरची कंटेनरला धडक; १ जण जखमी

Success Story: घर, संसार सांभाळत पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवलं, MPSC परीक्षेत सुरैया देसाई महिलांमध्ये राज्यात आल्या पहिल्या

Appam Recipe: नाश्त्यासाठी घरच्या घरी झटपट बवनी स्पंजी आणि चविष्ट अप्पम, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT