मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं (Mahendra singh Dhoni) टीम इंडिया, चेन्नई सुपर किंग्ज (csk) आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स या संघासाठी टी-२० सामने खेळले आहेत. भारतीय संघाचं नेतृत्व करत असताना धोनीनं चमकदार कामगिरी करत अनेक विश्वविक्रम केले आहेत. आयपीएलमध्येही (IPL) धोनीनं धडाकेबाज फलंदाजी करुन चेन्नईच्या संघाला आतापर्यंत चारवेळा अजिंक्यपद मिळवून दिलं आहे. यंदाच्या मोसमात धोनी कमालीचा फॉर्ममध्ये असून एका नव्या विक्रमालाही (cricket record) त्यानं गवसणी घातली आहे. दिग्गज खेळाडूंना मागो टाकत धोनीनं हा विक्रम केला असून त्याच्या जवळपास कोणताही खेळाडू नाहिये. दरम्यान, टी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये २०० झेल पकडणारा धोनी हा पहिला खेळाडू बनला आहे.
महेंद्र सिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून १५ ऑगस्ट २०२० ला बाहेर पडला. परंतु, धोनी आताही पूर्वीप्रमाणेच आक्रमक अंदाजात आयपीएलमध्ये खेळत आहे. तसंच चेन्नई सुपर किंग्ज संघाचं नेतृत्व पुन्हा एकदा धोनीकडे सोपवल्यानंतर चेन्नईच्या खेळाडूंना अनुभवी कर्णधाराचं मार्गदर्शन मिळत आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये रविवारी सामना रंगला. या सामन्यात धोनीनं दोनशेवा झेल पकडून नव्या विक्रमाची नोंद केली.
धोनीनं ३४७ टी-२० सामन्यात पकडले तब्बल २०० झेल
दिल्ली कॅपिटल्स विरोधात झालेल्या सामन्यात धोनीनं दोन झेल पकडले. धोनीनं पहिला झेल रोवमॅन पॉवेलचा पकडून त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर धोनीनं दुसरा झेल शार्दूल ठाकूरचा पकडला. दरम्यान, धोनीचं झेल पकडण्याचं द्विशतकही पूर्ण झालं.धोनीनं विकेटकीपर म्हणून आतापर्यंत ३४७ टी-२० सामने खेळले असून तब्बल २०० झेल पकडल्या आहेत.धोनीनं सर्व सामने टीम इंडियासाठी, चेन्नई सपुर किंग्ज आणि पुणे सुपरजायंट्स संघासाठी खेळले आहेत.
धोनीनंतर दिनेश कार्तिकचा नंबर
महेंद्र सिंग धोनीनं खेळलेल्या ३४७ टी-२० सामन्यात २८४ फलंदाजांना बाद केले आहेत. यामध्ये ८४ स्टम्प आऊटचा समावेश आहे. भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला धोनीनं केलेला विक्रम मोडण्याची संधी आहे. सर्वाधिक झेल पकडण्याच्या लिस्टमध्ये कार्तिक दुसऱ्या स्थानावर आहे. कार्तिकने विकेटकिपर म्हणून २९९ टी-२० सामने खेळले असून १८२ झेल पकडले आहेत. तर २४३ फलंदाजांना बाद केले असून यामध्ये ६१ स्टम्प आऊटचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.