MS Dhoni Viral Video Saamtv
Sports

MS Dhoni Viral Video: धोनी म्हणजे धोनीच! खास पाहुण्यांसोबत कॅप्टन कूलचं हटके बर्थडे सेलिब्रेशन; अवघ्या २० मिनिटात लाखो व्ह्यूज..

Ms Dhoni Instagram Post: लोकप्रियता असावी तर अशी! पाच महिन्यातून धोनीची सोशल मीडियावर पोस्ट अन् अवघ्या काही मिनिटांत लाखो लोकांनी पाहिला व्हिडिओ....

Gangappa Pujari

Mahendra Singh Dhoni Birthday Celibration Viral Video: भारतीय क्रिकेट (Indian Cricket Team) संघाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा (Ms Dhoni Birthday) काल वाढदिवस झाला. महेंद्रसिंग धोनीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

सोशल मीडियावर अनेक दिग्गजांसह धोनीच्या चाहत्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या. माहिच्या या वाढदिवसानंतर धोनीने आता सोशल मीडियावर त्याच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. (Ms Dhoni Latest Post)

कॅप्टन कूलचा वाढदिवस....

महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) हा क्रिकेट विश्वातील एक लोकप्रिय खेळाडू म्हणून ओळखला जातो. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्याचे नाव घेतले जाते. शांत व संयमी कर्णधार म्हणून धोनीची क्रिकेटच्या मैदानावर खास ओळख आहे. म्हणूनच त्याला क्रिकेट विश्वात कॅप्टन कूल (Captain Cool) म्हणून ओळखले जाते. कालच (७ जुलै) कॅप्टन कूलचा वाढदिवस झाला.

चाहत्यांच्या शुभेच्छा...

सोशल मीडियावर महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांनी अनेक माध्यमांतून लाडक्या माहीला जोरदार शुभेच्छा दिल्या. कुणी भलेमोठे होर्डिंग लावून तर कोणी थेट त्याला रक्ताने पत्र लिहत लाडक्या खेळाडूला शुभेच्छा दिल्या. आता सोशल मीडियावर धोनीने त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो अवघ्या काही मिनिटात (Viral Video) तुफान व्हायरल होत आहे.

खास पाहुण्यांनी वेधले लक्ष...

या व्हायरल व्हिडिओमध्ये धोनी वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याच्या या वाढदिवसाला खास पाहुण्यांनी हजेरी लावली आहे. जो पाहून सगळेच चकित झाले आहेत. महेंद्रसिंग धोनीने त्याच्या घरातील कुत्र्यांसोबत त्याचा वाढदिवस साजरा केला असून व्हिडिओमध्ये तो त्याच्या कुत्र्यांना केक चारत असल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News)

चाहते फिदा...

नेहमीच त्याच्या अनोख्या, साध्या, खास स्टाईलमध्ये धोनीने केलेलं हे सेलिब्रेशन चाहत्यांना खूपच आवडले असून या व्हिडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. अनेकांनी धोनीच्या या हटके सेलिब्रेशनचे कौतुक केले आहे.

काही जणांनी त्याच्या या साधेपणा चांगलाच भावला आहे. अवघ्या काही मिनिटात धोनीच्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाल्या असून पाच महिन्यानंतर धोनीने सोशल मीडियावर पुन्हा एकदा मार्केट जाम केल्याचे पाहायला मिळत आहे. (Latest Cricket News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT