IND vs PAK Match: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठी अपडेट; पाकिस्तान सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

ICC World Cup 2023: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत पाकिस्तानचं सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
ind vs pak
ind vs pak saam tv
Published On

India And pakistan cricket Match News: आयसीसीने एकदिवसीय विश्वचषकाच्या स्पर्धेचं वेळापत्रक जारी केलं आहे. या विश्वचषकात १० आंतरराष्ट्रीय संघ मैदानात उतरणार आहेत. तर १५ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याआधीच पाकिस्तानचं सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. (Latest Marathi News)

पाकिस्तानची परराष्ट्र मंत्री भुट्टो यांच्यावर जबाबदारी

पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची मोठी जबाबदारी सोपवली आहे. पाकिस्तानने सामना होण्याआधी तपास पथक अहमदाबाद येथे पाठविणार आहे. हे पथक इतरही व्यवस्था पाहणार आहेत. तपास पथकाच्या अहवालाच्या आधारावरच पाकिस्तानी सरकर त्यांचा संघाला भारतात पाठवणार आहे.

ind vs pak
Team India In Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी BCCI चा मोठा निर्णय! या स्पर्धेत करणार मोठा बदल

पाकिस्तानी सरकारला परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना या पथकाचं प्रमुख केलं आहे. यात पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने त्यांच्या काही प्रतिनिधींचाही पथकात सामावेश केला आहे.

पाकिस्तानचं तपास पथक

दरम्यान, पाकिस्तान संघ हा हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता येथेही लीग राऊंड खेळणार आहे. पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तानचा चेन्नईमध्ये सामना होणार आहे. पाकिस्तानचं क्रिकेट बोर्ड सामन्याचं ठिकाण बदलू इच्छित आहे. या सामन्यासंदर्भात तपास पथक त्यांचा अहवाल त्यांच्या सरकारकडे सोपवणार आहे. पाकिस्तान संघ त्यांचा पहिला सामना ऑक्टोबरमध्ये हैदराबादमध्ये नॅदरलँडच्या विरुद्ध खेळणार आहे.

पाकिस्तान सरकार विश्वचषकात त्यांचा संघ भारतात पाठवणार का, याबाबतचा निर्णय लवकर उघड करणार नसल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानी सरकार आणि बीसीसीआयचा आशिया स्पर्धेच्या ठिकाणावरून मोठा वाद झाला.

आशिया स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानला मिळाले आहे. मात्र, बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, भारतीय संघ आशिया स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही. या मोठ्या वादानंतर या स्पर्धेचे ४ सामने पाकिस्तानात होणार आहेत तर ९ सामने श्रीलंकेत होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना देखील श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहे.

ind vs pak
Sourav Ganguly Net Worth: कोट्यवधींच्या आलिशान कार अन् ४८ खोल्या असलेलं राजमहल! पाहा सौरव गांगुलीची एकूण संपत्ती

असे आहेत भारतीय संघाचे सामने..

८ ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई

११ ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली

१५ ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद

१९ ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे

२२ ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला

२९ ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ

२ नोव्हेंबर - भारत विरुद्ध क्वालिफायर, मुंबई

५ नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता

११ नोव्हेंबर - भारत विरुद्ध क्वालिफायर, बेंगळुरू (ICC ODI WC 2023 Time Table)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com