Team India In Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी BCCI चा मोठा निर्णय! या स्पर्धेत करणार मोठा बदल

Indian Cricket Team in Asian Games 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या( बीसीसीआयच्या) सर्वोच्च परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
team india
team indiasaam tv
Published On

Team India: आगामी वर्ल्डकप २०२३ स्पर्धेपूर्वी चीन येथे आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. यात पुरुष आणि महिला संघ देखील जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआयच्या) सर्वोच्च परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. (Team India In Asian Games)

team india
WI vs IND: कसोटी मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचं टीम इंडियाला ओपन चॅलेंज! धमकी देत म्हणाला...

येत्या सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात हांगजो आशियाई क्रीडा स्पर्धा खेळवली जाणार आहे. व्यस्त वेळापत्रक पाहता या स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिलांचा क्रिकेट सहभाग घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता बीसीसीआयने या सर्व प्रश्नांना पूर्णविराम देत, हिरवं कंदील दाखवलं आहे.

या स्पर्धेचे आयोजन २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान केले जाणार आहे. यादरम्यान भारतात वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा ब संघ चीनला रवाना होणार आहे.

तर महिलांचा फुल स्ट्रेंथ संघ या स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवन युवा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे सामने २८ सप्टेंबर रोजी तर महिलांचे सामने १९ सप्टेंबरपासून होणार आहेत. (Latest sports updates)

team india
Happy Birthday Sourav Ganguly: Righty बॅटिंग करणारा गांगुली Lefty कसा बनला? वाचा रोमांचक किस्सा

बीसीसीआयचा मोठा निर्णय..

बीसीसीआयने सैयद मुश्ताक अली ट्रॉफीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत देखील इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागू केला जाणार आहे. यापूर्वी आयपीएल २०२३ स्पर्धेत देखील हा नियम लागू केला गेला होता. अनेक संघांसाठी हा नियम फायदेशीर ठरला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com