Buldhana News: धक्कादायक! वाळू माफियाच्या वाहनाचा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला; पाठीमागून दिली धडक

Buldhana Latest News: शासकीय वाहनाचे चांगलेच नुकसान झाले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली आहे.
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

संजय जाधव, प्रतिनिधी...

Buldhana Crime: वाळू माफियांच्या मुजोरीच्या अनेक घटना राज्यात सध्या समोर येत आहेत. एका महिन्यापूर्वी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर गाडी घालण्याचा प्रयत्न वाळू माफियांकडून झाला होता. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. आता बुलढाणामधूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यात वाळू माफियांच्या वाहनाने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Buldhana News
Pune Crime News : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची हत्या, दोघे पाेलिसांच्या ताब्यात

याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील सुरा सरंबा या परिसरामध्ये अवैध रेती उपसा करून त्याची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांना मिळाली. त्यावरून उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी हे वाळू तस्करांच्या विरोधात मोहीम राबवली. त्यांना सुरा-सरंबा मार्गावर विना नंबरचे टिप्पर रेतीची वाहतूक करताना आढळल्याने या टिप्परचा पाठलाग केला.

हा पाठलाग करताना पाठीमागून वाळू माफियांच्या आलेल्या बोलेरो कारने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला धडक देत त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये सुदैवाने शासकीय कर्मचाऱ्यांचा जीव वाचला. मात्र शासकीय वाहनाचे चांगलेच नुकसान झाले असल्याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Buldhana News
Sharad Pawar News: मी आता आणखी ठणठणीत झालोय...; शरद पवारांचा Video Viral

याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी रवींद्र घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाळू माफिया स्वप्निल तळेकर, बळीराम मुंडे व अज्ञात दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणे यासह इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सध्या आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा व वाहतूक सुरू असल्याच्या घटनांना यावरून दूजोरा मिळत असून शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ले करण्याची मजल वाळू माफियांनी मारली आहे. त्यामुळे अशा वाळूतस्करांवर कडक कारवाई होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com