Maharashtra Political News: राज्याचं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. अजित पवारांनी बंड करत पक्षावर दावा केल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे शरद पवारांनी जनमानसात जाण्याचा निर्णय घेतला असून आज येवल्यात शरद पवारांची जाहीर सभा पार पडली. (Latest Marathi News)
येवल्याच्या सभेसाठी प्रवास करताना आंबेगाव तालुक्यातील ताराबाई हरिभाऊ निघोट यांच्याशी शरद पवारांनी व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा केली. त्यावेळी ताराबाई यांनी तब्येतीची विचारपूस करत असताना 'आता मी एकदम ठणठणीत आहे', असं शरद पवार म्हणाले. खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर पवारांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
तसेच व्हिडिओ पोस्ट करत अमोल कोल्हेंनी लिहिलं आहे की, हा मातामाऊलींचा विश्वास आदरणीय शरद पवार साहेबांवर. “आता आणखी ठणठणीत झालोय” हे साहेबांचं वाक्य अनेकांना उमेद देणारं आहे! उमेद संघर्षाची, तत्वांसाठी लढण्याची! आंबेगाव तालुक्यातील ताराबाई हरिभाऊ निघोट यांच्यासोबत पवार साहेबांची ही बातचीत ऊर्जा देणारी आहे, असं अमोल कोल्हेंनी म्हटलंय. अमोल कोल्हेंनी पोस्ट केलेला व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे.
शरद पवार (Sharad Pawar) हे राजकारणातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. वयाच्या ८३ व्या वर्षीही राज्यभर दौरे करून तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा नव्याने उभं करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनीही शरद पवारांचा एक फोटो ट्विट केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी एक प्रसिद्ध कवितेच्या ओळींचा उल्लेख केला आहे.
या फोटोमध्ये शरद पवार त्यांच्या कारमध्ये आहेत. शेजारी जितेंद्र आव्हाडही बसलेत. पावसामुळे शरद पवार भिजले आहेत. वडिलांचा हा फोटो पोस्ट करत सुप्रिया सुळेंनी प्रेरणादायी ओळी लिहिल्यात. भाग गए रणछोड़ सभी, देख अभी तक खड़ा हूँ मैं; ना थका हूँ ना हारा हूँ, रण में अटल तक खडा हूँ मैं., अशा त्या ओळी आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.