maharashtra kesari kusti 2022
maharashtra kesari kusti 2022 saam tv
क्रीडा | IPL

Maharashtra Kesari: बाला रफिकचा पराभव; दिग्गज मल्लांत आज उपांत्य फेरीची लढत

Siddharth Latkar

सातारा : येथील (satara) छत्रपती शाहू क्रीडा संकुलात सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती (maharashtra kesari) स्पर्धेत पहिल्या दिवसांपासून धक्कादायक निकाल लागू लागले आहेत. साता-याच्या किरण भगत (kiran bhagat) याच्यानंतर बाला रफीक (bala rafik) याचा देखील पराभव झाला आहे. दरम्यान कुस्तीशाैकीनांना साता-याच्या मातीत स्पर्धेतील तिस-या दिवशी चूरशीच्या कुस्त्या पाहण्यास मिळाल्या. (maharashtra kesari latest marathi news)

स्पर्धेतील (wrestling) तिस-या दिवशी माती गटात झालेल्या लढतीती धक्कादायक निकाल लागले. यामध्ये बाला रफीक यास पराभवाचा धक्का बसला. एकतर्फी झालेल्या लढतीत मुंबईच्या विशाल बनकरने (vishal bankar) रफिकवर १३-०३ अशी मात केली. यामध्ये पहिल्या फेरीत तीन- पाच अशी विशाल बनकरने आघाडी घेतली हाेती. त्यानंतर त्याने लागोपाठ दुहेरी पट काढून सहा गुणांची कमाई करीत कुस्ती जिंकली. गादी गटात गतवर्षीच्या विजेत्या महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने (harshvardhan sadgir) संग्राम पाटील (sangram patil) याचा एक गुणाने पराभव केला.

दरम्यान सिकंदर शेख विरुद्ध विलास डोईफोडे या लढतीत सिकंदर शेख दहा शून्यने विजयी मिळळविला. कौतुक ढाफळे विरुद्ध अनिल जाधव यात अनिल जाधवने चितपटीने विजयी मिळविला. हर्षवर्धन कोकाटे विरुद्ध गणेश जगताप यांच्यात हर्षवर्धनने बाजी मारली. भारत मदनेने विक्रम पारखीवर चितपटीने विजयी मिळविला.अन्य कुस्तीत अक्षय शिंदेने मेघराज शिंदेवर तसेच पृथ्वीराज पाटीलने सुदर्शन कोतकरवर दहा गुणांनी मात केली.

गुरुवारी माती अन गादी विभागात झालेल्या लढतीत बऱ्याच पैलवानांचा दमासास लागला. एकलांगी कुंडीत, घुटना पट अशा विविध डावाचे चित्त थरारक दर्शन प्रेक्षकांना झाले. कुस्ती निकाली काढण्यासाठी लागणारे कसब मल्ल दाखवत होते पण बऱ्याच कुस्त्या तांत्रिक निकालावर काढाव्या लागल्या . दरम्यान पैलवानांना उष्म्यामुळे लवकर थकवा येत असल्याचे दिसून आले.

maharashtra kesari kusti 2022

आज सायंकाळच्या सत्रात महाराष्ट्र केसरी गटाची उपांत्य फेरी

माती विभाग

ज्ञानेश्वर (माउली) जमदाडे विरूध्द सिकंदर शेख

महेंद्र गायकवाड विरूद्ध विशाल बनकर

गादी विभाग

हर्षवर्धन सदगीर विरूध्द हर्षद कोकाटे

अक्षय शिंदे विरुद्ध पृथ्वीराज पाटील

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Travel Places Near Rishikesh: ऋषिकेश जवळील नयनरम्य ठिकाणं; कमी खर्चात करा भरपूर एन्जॉय

Amey Wagh Post: 'आता कोणीही कोणत्याही पक्षात जावं, युती करावी....' अमेय वाघची मतदानानंतर पोस्ट

IPL 2024 Playoffs Scenario: मुंबई,पंजाबसह गुजरात स्पर्धेतून बाहेर! ३ स्थानांसाठी ६ संघांमध्ये चुरशीची लढत

Ghatkopar Hoarding News : घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Health Tips: तुमच्या जिभेचा रंग पांधरा पडल्यास 'या' आजारांची शक्यता असू शकते

SCROLL FOR NEXT