Maharashtra Kesari Saam Tv
Sports

Maharashtra Kesari: साता-यात आजपासून रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

ही स्पर्धा कुस्ती शाैकिनांना पाहता यावी यासाठी ५५ हजार प्रेक्षक बसतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

Siddharth Latkar

सातारा : महाराष्ट्र केसरी कुस्ती (maharashtra kesari kusti) स्पर्धा (competition) येथील (satara) श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आजपासून (मंगळवार) रंगणार आहे. या स्पर्धेसाठी संकुलातील मुख्य मैदानात मातीचे दाेन माेठे आखाडे तसेच गादी प्रकारासाठी आखाडा तयार करण्यात आला आहे. आज सायंकाळी सहा वाजल्यानंतर प्रत्यक्ष कुस्ती स्पर्धेस प्रारंभ हाेईल अशी माहिती आयाेजकांनी दिली. (maharashtra kesari kusti latest marathi news)

या स्पर्धेत राज्यातील ४५ संघातील सुमारे ९०० मल्ल विविध वजनी गटात त्यांचे काैशल्य सिद्ध करणार आहेत. आज दुपारी दाेन वाजता मल्लांची वैद्यकीय तपासणी आणि वजन तपासणी हाेईल. त्यानंतर प्रत्यक्षात सायंकाळी सहा वाजता स्पर्धेस प्रारंभ हाेईल असे कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव माेहिते यांच्यासह कार्यकारी सचिव ललित लांडगे तसेच जिल्हा तालीम संघचे दीपक पवार आणि सुधीर पवार यांनी नमूद केले. त्यानंतर दरराेज सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी पाच नंतर कुस्त्यांना प्रारंभ हाेईल असेही आयाेजकांनी नमूद केले.

नऊ एप्रिल पर्यंत चालणा-या या स्पर्धेचे उदघाटन आज (मंगळवार, ता. ५) सायंकाळी पाच वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (ramraje naik nimbalkar) यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते हाेणार आहे. ही स्पर्धा कुस्ती शाैकिनांना पाहता यावी यासाठी ५५ हजार प्रेक्षक बसतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती संयाेजकांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल; मुख्य आरोपींमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव

Car Insurance : कार इन्शुरन्स क्लेम होऊ शकतो रद्द; चुकूनही करू नका या १० चुका

SCROLL FOR NEXT